Chhatrapati Sambhajinagar Accident: प्रवाशांनी भरलेल्या खासगी बसचा टायर फुटल्याने अपघात; 12 जण जखमी

जखमींना तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालय मध्ये उपचारासाठी हलविले आहे.
Chhatrapati Sambhajinagar Accident
Chhatrapati Sambhajinagar AccidentSaamtv
Published On

Chhatrapati Sambhajinagar Accident News: पुण्यावरून छत्रपती संभाजीनगर कडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या खासगी बसचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. लिंबे जळगाव शिवारात असणाऱ्या इंडियन पेट्रोल पंपाच्या समोर खाजगी लक्झरीचे टायर फुटल्याने हा अपघात झाला. यामध्ये १० ते ३५ जण जखमी झाल्याचे समोर आले आहे.

Chhatrapati Sambhajinagar Accident
Jalna Farmer End Life: शेतीच्या कामासाठी लागणारा खर्च कुठून आणायचा?, चिंतातूर तरुण शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यावरून (Pune) छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या खाजगी लक्झरीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. लिंबे जळगाव शिवारात असणाऱ्या इंडियन पेट्रोल पंपाच्या समोर टायर फुटल्याने हा अपघात झाला.

अपघातानंतर ही महामार्गाच्या कडेला असणाऱ्या पाच फूट उंच भिंतीवरती जाऊन नालीत आदळली. या लक्झरीमध्ये 35 ते 35 प्रवाशी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर यातील दहा ते बारा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.. (Latest Marathi News)

Chhatrapati Sambhajinagar Accident
Maharashtra News : राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षणांर्गत 3 लाख 50 हजार युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे

या अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांनी कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ रुग्णवाहिकेला संपर्क साधून जखमींना तात्काळ छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील शासकीय रुग्णालय मध्ये उपचारासाठी हलविले आहे.

जालन्यामध्येही भीषण अपघात...

दरम्यान, जालन्यामधूनही एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. जालनामध्ये भाविकांच्या कारला भीषण अपघात (Jalna Car Accident) झाल्याची घटना घडली. भरधाव कारला पिकअपने जोरदार धडक दिली. अपघातानंतर कारला भीषण आग लागली. या आगीमध्ये एका महिलाचा होरपळून मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये कार जळून खाक झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com