Jalna Farmer End Life
Jalna Farmer End LifeSaam Tv

Jalna Farmer End Life: शेतीच्या कामासाठी लागणारा खर्च कुठून आणायचा?, चिंतातूर तरुण शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

Jalna Police: अतिवृष्टी, सततची नापिकी यामुळे घेतलेले पीक कर्ज फेडायचे कसे या विवंचनेतून शेतकऱ्याने आत्महत्या केली.
Published on

लक्ष्मण सोळुंके, जालना

Jalna News: राज्यामध्ये शेतकरी आत्महत्येच्या (Farmer End Life) घटना वाढतच चालल्या आहेत. अशामध्ये जालनामध्ये एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. भोकरदन तालुक्यातील खापरखेडा गावातील तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणाची नोंद भोकरदन पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Jalna Farmer End Life
Ahmednagar Crime News: एकतर्फी प्रेमातून तरुणाची आत्महत्या, भावांनी मिळून मुलीच्या बापालाच संपवलं; अहमदनगर हादरले

मिळालेल्या माहितीनुसार, खापरखेडा गावामध्ये राहणारा तरुण शेतकरी शिवाजी रावसाहेब सपाटे (३३ वर्षे) याने आत्महत्या केली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून शिवाजीने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. शिवाजी कोणालाही न सांगता घरातून निघून गेला होता. वेळ झाला तरी घरी कसा आला नाही म्हणून नातेवाईकांनी सगळीकडे त्याचा शोध घेतला.पण शिवाजी कुठेच सापडला नाही.

Jalna Farmer End Life
Parbhani Crime News: परभणी हादरलं! लॉजवर नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; परिसरात खळबळ

शेवटी आज सकाळी सात वाजताच्या सुमारास गावातील राहात्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेच त्याचा मृतदेह आढळून आला. घरातील लोखंडी अँगलच्या दोरी बांधून शिवाजीने गळफास घेतला होता. गावकऱ्यांनी तात्काळ भोकरदन पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत शिवाजीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

Jalna Farmer End Life
Jalna News: रात्री जेवण करून शेतात गेले ते परतलेच नाही; पाऊस नसल्याने विवेचनेतून शेतकऱ्याची विहरीत उडी

त्यानंतर शिवाजीचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आज खापखेडा गावातील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात शिवाजीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. शेतकरी शिवाजी सपाटे गेल्या अनेक दिवसांपासून अतिवृष्टी, सततची नापिकी यामुळे घेतलेले पीक कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. अशातच जून महिना उलटून ही पाऊस नसल्याने शेतीच्या कामासाठी लागणारा खर्च कुठून आणायचा या चिंतेतून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. या प्रकरणाचा तपास भोकरदन पोलीस करत आहेत.

Jalna Farmer End Life
Solapur Pune Highway Accident News : सोलापूर पुणे महामार्गावर चार वाहनांचा अपघात, एक ठार; ग्रामस्थांनी राेखली वाहतुक

दरम्यान, राज्यात गेल्या पाच महिन्यांत 391 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. शतकरी कर्ज, नापिकी, नैराश्याला कंटाळून हे शेतकरी आत्महत्यासारखी टोकाची पाऊलं उचलत आहेत. शेतीसाठी कर्ज घेऊन खर्च करायचा पण अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे हाती आलेले पिकांचे नुकसान होते. त्यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून हे शेतकरी आत्महत्या करतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com