Parbhani Crime News: परभणीच्या सेलूतून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. सेलू शहरातील रेल्वे स्थानक जवळील गोविंदा लॉजवर एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, सेलू शहरातील रेल्वे स्थानकाच्या रस्त्यावर दुपारी दोन वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतर परिसरात नागरिकांनी लॉजजवळ धाव घेतली. त्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक जमा झाले. या घटनेमुळे शहरातील महिला सुरक्षेवर नागरिकांडून उपस्थित करण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी पीडित मुलीला ताब्यात घेतले. तर आरोपीला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. दरम्यान, अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी जामीर आणि मोबिन यांच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी सूनिल ओहोळ, पोलीस निरिक्षक रावसाहेब गाडेवाड यांच्या मार्गदर्शनात अंधारे करत आहेत.
परभणीत सात ते आठ लॉज आहेत. लॉजवर एखादा रुम बुक करायची असल्यास कागदपत्रांची पुर्तता करावी लागते. यासाठी आधार कार्ड किंवा इतर रहिवाशी पुरावा बंधकारक आहे. परंतु लॉज चालकाकडून पैशांसाठी अल्पवयीन मुलं-मुली, तरुण-तरुणींना राहण्यासाठी रुम देत आहे.
यासाठी दोन तासासाठी दीड ते दोन हजार रुपये भाडे आकारत आहे. यामुळे अशा घटना घडत आहेत. यामुळे पोलिसांनी अशा लॉजवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमध्ये होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.