Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. ते आमच्या बरोबर येतील, हा मला विश्वास आहे. मनोज जरांगे पाटील यांची निश्चितच महाराष्ट्रात ताकद आहे, असे वक्तव्य छत्रपती संभाजी राजे (chhatrapati sambhaji raje News) यांनी केलेय. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात ते बोल होते. यावेळी त्यांनी राज्यात विधानसभा लढणार असल्याचे जाहीर केले. तसेच मनोज जरांगे पाटील यांना सोबत घेण्याचं सुरु असल्याचेही सांगितले.
जरांगे पाटील कुणाच्या सांगण्यावरून काही करतील, असं वाटत नाही. ते समाजाचा अंदाज घेत असतील म्हणून त्यांना वेळ लागत असेल. मला निर्णय घ्यायचा असेल तर मी मनोज जरांगे पाटील यांना विचारेल मला कमीपणा नाही. प्रकाश आंबेडकर यांच्यावर मी भाष्य करणार नाही. मनोज जरांगे पाटील कोणाच्या ऐकण्यातील नाही, त्यांनी स्वतःचे अस्तित्त्व तयार केले आहे, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले.
त्यांच्यात कोण मुख्यमंत्री याच्यात आम्हाला इंटरेस्ट नाही, त्यांनी मुख्यमंत्री कोण? यातच गुंतून राहावे. आमचे नियोजन झालं आहे. वंचितसोबत युती झाली तर नॅचरल आहे, शाहू महाराज आणि आंबेडकर यांनी काम केले आहे. ते आंबेडकर यांचे नातू, मी महाराजांचा पणतू, वेळ आली तर मी एक पाऊल पुढे टाकेल. मायावती यांचे महाराष्ट्रचे निरक्षक सिद्धार्थ हे माझ्यासोबत राज्यसभेत होते. आम्हालाच गणित बसेना, बसपाचे माहिती नाही, नाशिकला जंगी कार्यक्रम झाला. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 50 टक्के आरक्षण दिले, शिवाजी महाराजांनी १८ पगड जातींना सोबत घेऊन काम केले, असे छत्रपती संभाजी राजे म्हणाले.
आरक्षण सगळ्यांना मिळाले पाहिजे, मराठ्यांना दिलेले आरक्षण दोनदा उडाले आहे. आम्ही सत्तेत आलो तर कुणालाही न दुखावता आरक्षण देऊ शकतो. कायद्यात बसवून आम्ही आरक्षण देऊ, इतर अनेक मुद्दे जाहीरनाम्यात असतील. - मराठा आणि कुणबी एकच आहे, आरक्षण कसं देता येईल आत्ताच सांगणार नाही. सत्तेतील लोक गडबड करतील, बिहारला प्रयत्न झाला पण फसला गेला. सरकारने जे आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तो योग्य नाही. मराठा ओबीसीमध्ये भांडण लावले जात आहे, कोणीही आरक्षण विषय हाताळत नाहीये. ओबीसीत मायक्रो ओबीसी कंटाळले, ओबीसीत कुणाला लाभ होतोय याचा सर्व्हेक्षण व्हायला पाहिजे. २७ टक्के आरक्षण कुणाला जातंय, याच सर्व्हेक्षण व्हायला पाहिजे सगळे प्रश्न सुटतील, असे छत्रपती संभाजी राजे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.