Manoj Jarange Patil :...नाहीतर मराठे गुलाल लागू देणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा इशारा कुणाला? वाचा

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर मोठं भाष्य केलं आहे. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil In ParaliSaam tv
Published On

अक्षय शिंदे, साम टीव्ही प्रतिनिधी

जालना : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. राजकीय पक्षांचं जागावाटप जवळपास झालं आहे. यंदा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांची एन्ट्री झाली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत राज्यात जरांगे फॅक्टर दिसून आला होता. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा फटका कोणाला बसणार, यावर मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केलं.

राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधी मनोज जरांगे पाटील यांनी मोठं भाष्य केलं आहे. जरांगे फॅक्टर उमेदवार पाडणार की निवडून आणणार, यावर जरांगे यांनी थेट भाष्य केलं आहे. 'आचारसंहिता लागल मी दम धरतोय. मला वाटतं की, देवेंद्र फडणवीस साहेब मराठ्यांचा द्वेष सोडून देतील. असा आऊट करेन ना, ज्याची इच्छा होती जाट, गुर्जर सारखं आंदोलन मोडलं.. हातातून आणखी वेळ गेलेली नाही. सरकारने निर्णयांची अंमलबजावणी करा. जो फायदा करतो, समाज त्याचा फायदा करतो. नाहीतर मराठे गुलाल लागू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Manoj Jarange Patil
Jayant Patil : 'कोणाला वाईट वाटत असेल पण मला समाधान वाटलं...'; भरसभेत जयंत पाटील यांनी नरेंद्र मोदींचे मानले आभार

'देवेंद्र फडणीस मराठ्यांच्या लेकरांच्या मुळावर का उठतील, का त्यांचं वाटोळं करतील. ज्या जाती आरक्षणात जात नाहीत, त्यांनी आत घातल्या. मग आमचं तर 14 महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. आमचं का वाटोळ करतील, अशी आशा आहे. आम्ही इतके भोळे पण नाही की, आता आचारसंहिता जवळ आली तरी तेच ते शब्द बोलताय. शेवटच्या क्षणापर्यंत विश्वास ठेवावा, जसे की क्षत्रीय शेवटच्या क्षणापर्यंत लढतो. विश्वास ठेवू बघू, ते आचारसंहित पुढे ढकलतात का, असा सवाल जरांगे पाटील यांनी केलाय.

'निवडणूक जाहीर झाल्यावर ठरवू, मी संयमी आहे. दमदार आहे म्हणून टिकलो आहे. मला समाज संकटात जाऊ द्यायचा नाही, जो माझ्या समाजाला संकटात येणार आहे, जो मराठ्यांच्या आगीशी खेळला, त्याची राख केल्याशिवाय आम्ही सोडत नाही, भस्म लावून त्याला पुन्हा पाठवणार, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

Manoj Jarange Patil
MVA CM Face : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? नाना पटोलेंनी थेट सांगितलं,VIDEO

'त्यांनी सर्व जाहीर केल्याशिवाय मी पत्ते ओपन करत नाही. मागील निवडणुकीत त्यांनी मला हलक्यात घेतलं होतं. येथून पुढे देखील ते मला हलक्यात घ्यायला लागले. मला वाटलं काल शहाणे होतील, नारायण गडाचा कार्यक्रम झाल्यावर, त्यांना वाटत असेल, तो फॅक्टर फक्त लोकसभेपुरता होता, आता पुढे राहिला नाही. आधी दोन चारशे एकर भरलं होतं. आता 900 एकर भरलंय, असे जरांगे पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com