Maharashtra Politics: आधी CM फडणवीसांना भेटले, आता दिल्लीला जाणार, भुजबळांची नाराजी दूर होणार की मोठा निर्णय घेणार?

Chhagan Bhujbal Meets CM: छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ आणि ओबीसी या मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
chhagan bhujbal meets CM
chhagan bhujbal meets CMSaam tv
Published On

Chhagan Bhujbal Meets CM: महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. खातेवाटपही झालं. मात्र, मंत्रिमंडळाच्या विस्तारामधून काही नेत्यांना डावलण्यात आलं. ज्यामुळे काही नेते नाराज आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गोटातील नेते नाराज असल्याची चर्चा आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज आहेत. आज भुजबळ यांनी सागर बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोघांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली? या भेटीत नेमकं काय घडलं? याचं उत्तर भुजबळ यांनीच दिलंय.

छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ आणि ओबीसी या मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं. बैठकीनंतर भुजबळांनी माध्यमांसोबत संवाद साधला, ज्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांची ८-१० दिवसानंतर पुन्हा भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

chhagan bhujbal meets CM
Chhagan Bhujbal: नाराज छगन भुजबळ अचानक सागर बंगल्यावर, CM फडणवीसांशी चर्चा, मोठा निर्णय घेणार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीदरम्यान नेमकी कोणती चर्चा? भुजबळ म्हणाले, 'आज मी आणि समीर भुजबळ दोघांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भेटीमध्ये राजकीय आणि सामाजिक विषयांवर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, महायुतीला जो महाविजय मिळाला आहे, त्यामागे ओबीसीचे मोठे पाठबळ आहे. ओबीसी पाठबळ आपल्याला मोठ्या प्रमाणात लाभलं. ओबीसींनी महायुतीला जो आशीर्वाद दिला आहे, त्याचे आभार मानले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत ओबीसींचे नुकसान होणार नाही, याची मला काळजी आहे. मला ८-१० दिवस द्या, पुन्हा भेटू आणि मार्ग काढू असं चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असल्याचं छगन भुजबळ म्हणाले.

chhagan bhujbal meets CM
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांविरोधात अजित पवारांची नवी खेळी?

आता ५-६ दिवस शाळा कॉलेजला सुट्ट्या आहेत. राज्यात वेगळं वातावरण आहे. ८-१० दिवस तुम्ही मला द्या. आपण पुन्हा भेटू आणि निश्चित यावर मार्ग काढू असं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच मला विनंती केली की ओबीसी नेत्यांना सांगा की मी यावर विचार करतो आहे. ओबीसी आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या घटक आहे त्यांना सांगा, येत्या ८-१० दिवसात सखोल चर्चा होईल. असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असल्याचं छगन भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. दिल्लीत छगन भुजबळ अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

भुजबळांबाबत अजित पवार काय म्हणाले?

मंत्रिमंडळात जागा न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज आहेत. राष्ट्रावादी अजित पवार गटाकडून त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहे. 'अशातच अजित पवार यांना नाराज भुजबळांवर प्रश्न विचारले असता, हा आमच्या पार्टीचा अंतर्गत विषय आहे. तो आमचा आम्ही सोडवू . असे म्हणत अजित पवार यांनी भुजबळांवर बोलणे टाळले.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com