Chhagan Bhujbal News: जेवढे केस पिकले, तेवढे आंदोलने केली; 'नवा नेता' म्हणत छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर निशाणा

Chhagan bhujbal Latest news: 'माझे जेवढे केस पिकले, तेवढे आंदोलने केली आहेत, अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला आहे.
Chhagan Bhujbal News
Chhagan Bhujbal NewsSaam tv
Published On

Chhagan bhujbal News:

आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मराठा आरक्षणावरून जरांगे यांच्याकडून भरसभेत मंत्री छगन भुजबळांवर लक्ष्य केलं जात आहे. जरांगे यांच्या टीकेला छगन भुजबळांनी हिंगोलीतील ओबीसी मेळाव्यात प्रत्युत्तर दिलं आहे. 'माझे जेवढे केस पिकले, तेवढे आंदोलने केली आहेत, अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

हिंगोलीत ओबीसींचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात हजारो ओबीसी बांधवांनी हजेरी लावली. या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळांनी उपस्थितांना संबोधित केलं. 'काही जण म्हणत आहेत, भुजबळ म्हातारा झाला. हो म्हातारा झाला. सगळेच म्हातारे होणार.हे केस जे पिकले आहेत, ते एका आंदोलनाने पिकले नाहीत. जेवढे केस पिकले आहे, तेवढे आंदोलने केली आहेत, अशा शब्दात भुजबळांनी जरांगे यांना प्रत्युत्तर दिलं.

Chhagan Bhujbal News
Mahadev Jankar News: 'तर मी मुख्यमंत्री झालो असतो...' ओबीसी एल्गार सभेत महादेव जानकरांचे मोठं विधान

मेरीटविषयी भुजबळ काय म्हणाले?

सभेत मेरीटविषयी भुजबळ म्हणाले, गेल्या वेळेस MPSC परीक्षेत आमच्या समाजाचा कटॲाफ पॅाइंटमध्ये ९६ टक्के होता. ओपनमध्ये ५४ टक्के कट ॲाफपॅाइंट होता. गावबंदी…? कुणालाच सोडत नाही. मात्र, रोहित पवार, राजेश टोपे यांचं स्वागत करणार'.

गावबंदीचे बोर्ड काढा : छगन भुजबळ

'गावबंदी केल्यास एक महिन्याची शिक्षा आहे. सरकार, पोलीस हे करणार आहे की नाही? संविधान दिवस आहे. ते पाळणार आहे की नाही? गावबंदीचे बोर्ड काढा. ज्यांनी बोर्ड लावले, त्यांना एक महिन्याची शिक्षा द्या. मराठा समाजाला आरक्षण द्या, ओबीसीतून आरक्षण देऊ नका, असंही ते म्हणाले.

झुंडशाहीला विरोध : भुजबळ

'जाळपोळ करणाऱ्या झुंडशाहीला विरोध. पण मराठा समाजाला नाही. आता एकाला अटक केली, त्याच्याकडे पिस्तूल सापडलं. त्या दिवशी ज्या गोळ्या सापडल्या, त्या बंदूकीच्या होत्या. त्याला पीसीआर मिळाला नाही. एमसीआर मिळाला नाही. मग त्याची चौकशी कशी होणार? एका पोलीसाला धक्का लागला, तो आठ दिवस आत ठेवतो. पिस्तूल गोळ्या सापडल्या, त्याला सुरक्षित केलं जातं, अशी टीका भुजबळांनी केली.

Chhagan Bhujbal News
Varsha Gaikwad : संविधान संपवलं जातंय, संविधानाला घराघरात पोहचविणे गरजेचे : वर्षा गायकवाड

विठ्ठल आणि आरक्षणाचा संबंध काय? : भुजबळ

'तुम्ही सर्व मराठा समाजाला कुणबी करणार, राज्यात एकही मराठी शिल्लक राहणार नाही. पंढरपूरला येऊ नका असं सांगता. देवेंद्र फडणवीस यांना येऊ देणार नाही असं म्हणाले होते. देव सर्वांचा आहे. विठ्ठलाच्या पूजेला विरोध का? विठ्ठल आणि आरक्षणाचा संबंध काय? असा सवालही भुजबळांनी प्रश्न उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com