Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक कसे असेल; किती टप्प्यात होणार मतदान? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election : राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
Maharashtra State Assembly Elections 2024
Maharashtra Assembly Election 2024Saam tv
Published On

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्यात निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. राज्यात एका टप्प्यात मतदान होणार असून २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीविषयी महत्वाच्या बाबी अधोरेखित केल्या.

राज्यात महाराष्ट्रात २३४ सार्वत्रिक जागा आहेत. तर अनुसूचित जातीसाठी २९ तर अनुसूचित जमातीसाठी २५ जागा आहेत. महाराष्ट्रात एकूण १ लाख १८६ निवडणूक केंद्रे आहेत. ग्रामीण आणि शहरी भागात मतदार केंद्र आहेत.

Maharashtra assembly election
Maharashtra assembly election Saam tv

ज्येष्ठ नागरिकांना घरातून मतदान करण्याचा अधिकार

'महाराष्ट्रातील आदिवासी भागातील जनतेशी आयोगाने चर्चा केली आहे. त्यांचा टक्का जास्तीत जास्त असावा, यासाठी प्रयत्न आहे. मागच्या वेळी मुंबई शहरातून तक्रारी आल्या होत्या की, मतदार केंद्रावर सुविधा नाहीत. आम्ही त्या यावेळी सुधारल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक मतदारांना काही खुर्च्या असतील, तशा व्यवस्था सर्व मतदान केंद्रावर असेल. ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मतदाराला घरातून मतदान करण्याचा अधिकार असेल. सर्व मतदानाची व्हिडिओग्रफी केली जाईल, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले.

 assembly election
Maharashtra assembly election Saam tv
Maharashtra State Assembly Elections 2024
Maharashtra Assembly Election : पर्वती सोडून कुठे जाऊ? माधुरी मिसाळ उमेदवारीवर ठाम, पुण्यात महायुतीसमोर पेच!

'मुक्त वातावरणात निवडणुका झाल्या पाहिजे, अशा सूचना आम्ही दिल्या आहेत. सर्वांना मतदानाची संधी मिळाली पाहिजे. प्रत्येक चेक पोस्टवर तपासणी केली जाईल. सामान्य नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी आम्ही घेणार आहोत. 2 किलोमीटरच्या आत मतदान केंद्र असेल, असे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पुढे सांगितले.

मुख्य निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी २० नोव्हेंबरला मतदान होणार असल्याचे जाहीर केले. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून एका टप्प्यात मतदान होणार आहे,अशी माहितीही त्यांनी दिली.

Maharashtra State Assembly Elections 2024
Maharashtra Assembly Election : विधानसभेसाठी शिंदे गटाचा पहिला उमेदवार ठरला; भाजपमध्ये धडाधड राजीनामे पडणार?

कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम?

एकाच टप्प्यात होणार मतदान

२२ ऑक्टोबरला अधिसूचना

अर्ज भरण्याची अंतिम मुदत २९ ऑक्टोबर

अर्ज छाननी - ३० ऑक्टोबर

अर्ज माघारीची अंतिम मुदत ४ नोव्हेंबर

मतदानाची तारीख २० नोव्हेंबर

मतमोजणीची तारीख - २३ नोव्हेंबर

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com