Chandrayaan-3 Benefit: चांद्रयान-३ मुळे सर्वसामान्यांना काय मिळणार? वाचा सविस्तर माहिती सोप्या भाषेत

Chandrayaan-3 Benefit To Common People: चंद्रावर शेती, माणवी जीवन या गोष्टी शक्य आहेत का? याबाबत माहिती मिळणार आहे.
Chandrayaan-3 Successful Landing Video
Chandrayaan-3 Successful Landing Video Saam Tv
Published On

Chandrayaan-3:

चांद्रयान -३ मिशन यशस्वीरित्या पार पडल्याने प्रत्येक भारतीय नागरिकाने काल आनंद व्यक्त केला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. चांद्रयान - ३ साठी तब्बल ६१५ कोटींचा खर्च आलाय. आता हा सर्व खटाटोप केल्याने सर्वसामान्य म्हणजेच तुम्हा आम्हला काय फायदा मिळणार? (Latest Marathi News)

1. भारतीयांचा दर्जा वाढणार, तांत्रिक सुविधांमध्ये सुधारणा

सर्वसामान्य माणसासाठी चांद्रयान तीनचा काय उपयोग होणार हा प्रश्न प्रत्येक नागरिकाच्या मनात होता. या मिशनमुळे तांत्रिक सुविधा आणखीन वाढणारेत. अंतराळ क्षेत्रात भारत बलाढ्य झाल्यामुळे येथील नागरिकांचा दर्जा देखील वाढणार आहे. वर्षानुवर्षे नागरिकांच्या मनात असेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरे आता सुटणार आहेत. चंद्रावर शेती, माणवी जीवन या गोष्टी शक्य आहेत का? याबाबत माहिती मिळणार आहे.

Chandrayaan-3 Successful Landing Video
Chandra Guru Yuti : चंद्र-गुरु युतीमुळे गजकेसरी योग ! येत्या 30 दिवस या राशींना धनलाभ; नोकरीच्या नव्या संधी, प्रमोशनही मिळेल...

2. अंतराळाविषयी रहस्यमयी माहिती मिळेल

अंतराळात काय आहे. चंद्रावर पाणी, बर्फ यांसह युरेनियम आणि प्लॅटिनम देखील आहे का? याची माहिती रोव्हर पुढचे १४ दिवस विविध फोटोंच्या माध्यमातून पाठवत राहणार आहे. त्यामुळे या मिशनकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून आहे. मिशन १४ दिवसांनी पूर्ण झाल्यावर जगातील अनेक रहस्यमयी गोष्टी समोर येतील.

3. रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील

चांद्रयान-3 चा थेट परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. भारतात सध्या १४० नोंदणीकृत स्पेस-टेक स्टार्टअप्स काम करतायत. यामध्ये स्कायरूट, सत्सुरे, ध्रुव स्पेस यांचा समावेश आहे. सॅटेलाइट सिग्नलपासून ब्रॉडबँड आणि सोलर फार्मपर्यंत काम होतं. येत्या काळात अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे परकीय गुंतवणूक देखील वाढेल. परिणामी भारतातील रोजगाराच्या संधी वाढतील.

Chandrayaan-3 Successful Landing Video
Chandra Grahan 2022 : आज वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण, 'या' राशीच्या लोकांसाठी वाढू शकतात अनेक अडचणी

4. शेअर्समध्ये विक्रमी वाढ

चांद्रयान -३ साठी अनेक खासगी कंपन्यांनी कामे केली आहेत. यामध्ये वापरण्यात आलेले टू्ल्स आणि विविध पार्ट्स ज्या कंपन्यांनी बनवलेत त्यांत्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. अंतराळ कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आलीये. गोदरेज इंडस्ट्रीज, टाटा स्टील, एल अँड टी आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या शेअर्समध्ये विक्रमी वाढ झालेली दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com