Chandra Guru Yuti
Chandra Guru Yuti Saam tv

Chandra Guru Yuti : चंद्र-गुरु युतीमुळे गजकेसरी योग ! येत्या 30 दिवस या राशींना धनलाभ; नोकरीच्या नव्या संधी, प्रमोशनही मिळेल...

Rashi bhavishya In Marathi : या महिन्यात ४ बड्या ग्रहांचे राशीपरिवर्तन होत आहे. तर चंद्र-गुरु युतीमुळे गजकेसरी योग जुळून आला आहे.
Published on

Gajkesari Rajyog : ज्योतिषशास्त्रानुसार जुलै महिन्यात अनेक ग्रहाचे परिवर्तन होत आहे. त्यामुळे अनेक राशींना याचा चांगला व वाईट परिणाम भोगावा लागू शकते. या महिन्यात ४ बड्या ग्रहांचे राशीपरिवर्तन होत आहे. तर चंद्र-गुरु युतीमुळे गजकेसरी योग जुळून आला आहे.

मंगळ ज्या स्थानी विराजमान आहे त्या स्थानात गुरु-चंद्राचा संयोग जुळून आला आहे. या संयोगाने गजकेसरी योग तयार झाला आहे. ज्यामुळे पुढील 1 महिना 3 राशींचे भाग्य उजळेल. चला जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.

Chandra Guru Yuti
Shravni Somvar : श्रावणातल्या पहिल्या सोमवारी जुळून आलाय शुभ योग ! या 5 राशींची होणार चांदी, हे काम करा होतील अनेक इच्छा पूर्ण

1. मेष

चंद्र आणि बृहस्पतिच्या निर्मितीमुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. नवीन काम सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकता. तुमचे वैवाहिक (Marriage) जीवन चांगले राहील. अविवाहित लोकांच्या विवाहाची चर्चा सुरु होतील. वकील आणि शिक्षकांसाठी काळ चांगला राहील. त्याला प्रमोशन मिळू शकते. आपल्या घरी मांगलिक कार्य घडेल.

2. मिथुन

या राशीच्या लोकांना गजकेसरी राजयोगाच्या निर्मितीमुळे खूप फायदा (Benefits) होणार आहे. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून प्रशंसा मिळू शकते. अतिरिक्त जबाबदारीही मिळू शकते. व्यवसायात (Business) गुंतलेल्या लोकांना फायदा होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना चांगली बातमी मिळू शकते.

Chandra Guru Yuti
Vastu Tips : घरात शंकराची मूर्ती आणत असाल तर हे नियम लक्षात ठेवाच !

3. कर्क

व्यवसाय आणि करिअरच्या दृष्टीने ही युती फायदेशीर ठरेल. त्याच्या प्रभावाने, कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती मजबूत होईल. उपजीविकेच्या साधनांमध्ये वाढ होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीसह इतर जबाबदाऱ्याही दिल्या जाऊ शकतात. व्यावसायिकांना व्यवसाय विस्ताराची संधी मिळेल. व्यवसायात कौटुंबिक सहकार्य मिळेल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com