Chandra Grahan 2022 : आज वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण, 'या' राशीच्या लोकांसाठी वाढू शकतात अनेक अडचणी

चंद्रग्रहणात शनि आणि मंगळाच्या संयोगामुळे विनाशकारी योग तयार होणार आहे.
Chandra Grahan 2022
Chandra Grahan 2022 Saam Tv
Published On

Chandra Grahan 2022 : आज वर्षातले शेवटचे आणि दुसरे चंद्रग्रहण आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या ग्रहणामुळे अनेक समस्या वाढू शकतात. कारण या ग्रहणासोबतच अनेक ग्रहांचा संयोग असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ, शनि, सूर्य आणि राहू यांचा संयोग तूळ राशीत होत आहे. यासोबतच शनि आणि मंगळाच्या संयोगामुळे विनाशकारी योग तयार होणार आहे. जाणून घ्या, चंद्रग्रहणाच्या दिवशी कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

चंद्रग्रहणाचा प्रभाव या राशींवर नकारात्मक राहील

1. मेष

Aries
Aries Canva

चंद्रग्रहणामुळे मेष राशीच्या लोकांना त्रास होऊ शकतो. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात चंद्रग्रहणाची नकारात्मकता जास्त असेल. अशा परिस्थितीत आरोग्याशी (Health) संबंधित समस्यांसोबतच आर्थिक स्थितीवरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे चंद्रग्रहण काळात कोणतेही काम थोडे विचार करून केले तर ते चांगले होईल.

Chandra Grahan 2022
Dev Diwali 2022 : ग्रहांच्या अशुभ संयोगामुळे 'या' राशींवर होऊ शकतो परिणाम!

2. वृषभ

Taurus
TaurusCanva

ज्योतिष शास्त्रानुसार वृषभ राशीसाठी चंद्रग्रहण त्रास वाढवू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या (Student) जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो. यासोबतच आर्थिक स्थितीवरही परिणाम होईल.

3. कन्या

Virgo
VirgoCanva

कन्या राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण अनेक समस्या वाढवू शकते. या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे कोणतेही काम थोडे विचार करून केले तर ते अधिक चांगले होईल. यासोबतच कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. पण बोलण्यात थोडा संयम ठेवावा.

4. मकर

Capricorn
Capricorn Canva

चंद्रग्रहण मकर राशीसाठीही अनेक समस्या आणू शकते. छोट्या कामासाठीही जास्त मेहनत घ्यावी लागेल. समाजात मान-सन्मान वाढेल. त्याच वेळी, कामाच्या ठिकाणी काही मतभेद असू शकतात. त्यामुळे तुमचे काम सांभाळा, दुसऱ्याच्या कामात अडकणे टाळा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com