चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल बहिणीला भेटण्यासाठी आलेल्या भावाला अंधाराचा फायदा घेत लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
चंद्रपूरच्या (Chandrapur News) जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी बहीण भरती असल्याने तिची विचारपूस करण्यासाठी भाऊ आला होता. दरम्यान रुग्णालय परीसरात फिर्यादी अंधारात लघुशंका करण्यासाठी गेले असता तेथे तोंडाला दुपट्टे बांधून दोन अनोळखी मुले अचानक पुढे आली. त्यापैकी एकाने चाकु दाखवुन पैशाची मागणी केली. मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने त्याला दोघांनी मारहाण (Crime News) केली व जबरदस्तीने त्याचेकडील रोख ११ हजार रुपये आणि एक वापरता मोबाईल काढून पळून गेले.
एकजण पोलिसांच्या ताब्यात
यानंतर सदर इसमाने घडलेल्या प्रकाराबाबत (Police) पोलिसात तक्रार दिली. तक्रार मिळताच पोलिसांनी घटनेतील संशयित आरोपी शुभम उर्फ बाबु अमर समुद (रा. चंद्रपूर) याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून मोबाईल व गुन्हा करतेवेळी वापरलेला चाकु हस्तगत केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.