Sambhajinagar news : क्रिप्टो करन्सीत गुंतवणुकीच्या नावे अनेकांची फसवणूक; इसमाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Sambhajinagar News : आकर्षक परतावा मिळवून देण्याच्या नावाखाली जिल्ह्यातील 1 हजार जणांना सुमारे 150 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा पोलीसांना संशय आहे
Sambhajinagar news
Sambhajinagar newsSaam tv
Published On

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : पैसा गुंतवणुकीच्या अनुषंगाने अनेक जण तपस करत असतात. अशाना हेरून क्रिप्टो करन्सीत गुंतवणुक करण्याच्या नावाने हजारोंना गंडा घातला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी नाशिकच्या नरेंद्र पवार यास ताब्यात घेतले आहे. तसेच त्याने जिल्ह्यात १५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय आहे. 

Sambhajinagar news
Sangli Crime : सिनेस्टाईल पाठलाग करत चोरट्यांना पकडले; बेदम चोप देत केले पोलिसांच्या स्वाधीन


क्रिप्टो करेंसीच्या गुंतवणुकीतून मोठ्या परताव्याच्या अमिषा दाखवत (Sambhajinagar news) संभाजीनगर जिल्ह्यातील २० जणांना तब्बल १ कोटी २८ लाख ७२ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी नाशिकच्या नरेंद्र पवार याला पोलिसांनी अटक केली असून सदरील प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपस सुरु आहे. (Fraud) सदरचा प्रकार 2022 ते 2023 दरम्यान करत या वर्षभरात अनेकांची फसवणूक केली आहे. 

Sambhajinagar news
Kasara Railway Station : लोकल ट्रेनच्या कॅबिनमध्ये घुसून केला व्हिडीओ; दोन तरुणांना घेतले ताब्यात

आकर्षक परतावा मिळवून देण्याच्या नावाखाली जिल्ह्यातील 1 हजार जणांना सुमारे 150 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा पोलीसांना संशय आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाचा तपास अर्थिक गुन्हे शाखा करत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेल्या मिटमिटा येथे त्याने आपले कार्यालय सुरू करून ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक केल्यास २० महिन्यात दाम दुप्पट परतावा मिळेल असे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com