Wan Dam : नागापूरचा वाण प्रकल्प ओव्हरफ्लो; परळी शहराचा पाणी प्रश्न मिटला

Beed News : राज्यातील अनेक भागात मागील पंधरा- वीस दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. पावसाची संततधार सुरु असल्याने बहुतांश धरणात पाणीसाठा वाढला आहे.
Wan Dam
Wan DamSaam tv
Published On

बीड : गेल्या काही दिवसापासून बीडच्या परळी परिसरात कमी अधिक प्रमाणात संततधार पाऊस सुरु आहे. यामुळे परळी शहराला पाणी पुरवठा करणारे नागापूर येथील वाण प्रकल्प शंभर टक्के भरले असून ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळं परळीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. 

Wan Dam
Kasara Railway Station : लोकल ट्रेनच्या कॅबिनमध्ये घुसून केला व्हिडीओ; दोन तरुणांना घेतले ताब्यात

राज्यातील अनेक भागात मागील पंधरा- वीस दिवसापासून जोरदार पाऊस (Rain) सुरु आहे. पावसाची संततधार सुरु असल्याने बहुतांश धरणात पाणीसाठा वाढला आहे. यामुळे गतवर्षी कमी पावसामुळे निर्माण झालेली पाण्याची समस्या यंदा जाणवणार नसल्याचे चित्र सध्या तरी पाहण्यास मिळत आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस होत असून जिल्ह्यातील परळी (Parali) परिसरात देखील मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे परळीला पाणी पुरवठा करणारे वाण प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहे. 

Wan Dam
Sambhajinagar news : क्रिप्टो करन्सीत गुंतवणुकीच्या नावे अनेकांची फसवणूक; इसमाला पोलिसांनी घेतले ताब्यात

परळी तालुक्यातील बहुतांश सिंचनाखाली येणारा भाग देखील या धरणावर अवलंबून असल्याने या भागातील पाणीप्रश्न आता मिटला आहे. दरम्यान तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा आहे. नागापूर येथील वाण प्रकल्पाची क्षमता १९.७१ दश लक्ष घन मीटर एवढी आहे. वाण प्रकल्प शंभर टक्के भरल्याने आता वाण नदीही ओसंडून वाहू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com