Chandrapur Accident: चंद्रपुरात कार-ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू; कारचा झाला चुराडा

Chandrapur Truck And Car Accident: चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी-नागभीड महामार्गावर भरधाव कारने ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला. अपघातामध्ये जखमी आणि मृत झालेले सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत.
Chandrapur Accident: चंद्रपुरात कार-ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू; कारचा झाला चुराडा
Chandrapur AccidentSaam Tv

संजय तुमराम, चंद्रपूर

चंद्रपूरमधून भीषण अपघाताची (Chandrapur Accident) घटना समोर आली आहे. भरधावर कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी-नागभीड महामार्गावर हा अपघात झाला. अपघातामध्ये जखमी आणि मृत झालेले सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. या अपघाताचा तपास चंद्रपूर पोलिसांकडून सुरू आहे.

Chandrapur Accident: चंद्रपुरात कार-ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू; कारचा झाला चुराडा
Uttar Pradesh Accident: भीषण अपघात! डबल डेक्कर बसची दूधाच्या टँकरला जोरदार धडक, १८ प्रवाशांचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी-नागभीड महामार्गावर खरबी-माहेर फाट्यावर हा भीषण अपघात झाला. पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर ट्रक रस्त्यावर पलटी झाला. तर कारचा चुराडा झाला. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले आहेत. जखमींवर ब्रम्हपुरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Chandrapur Accident: चंद्रपुरात कार-ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू; कारचा झाला चुराडा
Bus Accident Video : चालकाचे नियंत्रण सुटलं अन् खासगी बस थेट दरीत, सापुतारा घाटातील अपघाताचा थरारक VIDEO

भरधाव कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. कारमधील सर्वजण नागपूर येथून गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे लग्न सोहळ्यासाठी निघाले होते. कार चालवाताना चालकाचा डोळा लागल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला.

Chandrapur Accident: चंद्रपुरात कार-ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू; कारचा झाला चुराडा
Nagpur Accident News: भीषण अपघात! सुसाट कार रेलिंगला धडकून ४- ५ वेळा उलटली, दोघांचा मृत्यू; ३ जखमी

या अपघातामध्ये मृत्यू आणि जखमी झालेले सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. दिलीप परसवानी आणि महेश परसवानी अशी मृतकांची नावं आहेत. अपघाताची माहिती मिळताच चंद्रपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ ब्रम्हपूरी येथील रुग्णालयात दाखल केले. तर अपघातामध्ये मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.

Chandrapur Accident: चंद्रपुरात कार-ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू; कारचा झाला चुराडा
Pune Accident News : हिट अँड रनच्या घटनेने पुणे पुन्हा हादरले; अज्ञात वाहनाने मध्यरात्री दोन पोलिसांना चिरडलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com