कारल्याची भाजी केल्याने मुलाची सटकली; नराधमाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण, आईचा जागीच मृत्यू

Son Kills Mother Over Cooking Bitter Gourd In Chandrapur: चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात कारल्याची भाजी बनवल्याच्या कारणावरून मुलाने आईची लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Police personnel investigating at the crime scene in Mul taluka, Chandrapur district after a shocking domestic murder
Police personnel investigating at the crime scene in Mul taluka, Chandrapur district after a shocking domestic murderSaam Tv
Published On

संजय तुमरूम, साम टीव्ही

चंद्रपूर: कारल्याची भाजी का बनवली, या क्षुल्लक कारणावरून नराधम मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे. मन सुन्न करणारी ही घटना जिल्ह्यातील मूल तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली असून सुमित्रा पेटकुले (६५) असे मृतक आईचे नाव आहे. आरोपी मुलाचे नाव जगदीश दशरथ पेटकुले (35) आहे.

Police personnel investigating at the crime scene in Mul taluka, Chandrapur district after a shocking domestic murder
टीव्हीचा आवाज कमी कर; नवरा ओरडला, भडकलेल्या बायकोने चाकूने भोसकून संपवलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री त्याच्या आईने कारल्याची भाजी केली होती. ही भाजी का केली म्हणून रागाच्या भरात सुमित्रा यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. दारूचे व्यसन आणि घरात मारहाण करणे यामुळेच त्याची पत्नी दोन महिन्यांपूर्वीच त्याला सोडून मुलांना घेऊन निघून गेली. त्यामुळे जगदीश हा आईसोबत राहत असे. गुरुवारी 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी जगदीश घरी आला तेव्हा आईने कारल्याची भाजी बनवली होती. कारले का बनविले म्हणून तो आईशी वाद घालू लागला आणि तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

Police personnel investigating at the crime scene in Mul taluka, Chandrapur district after a shocking domestic murder
Sambhajinagar Crime : मुंबई, पुण्यानंतर घोटाळ्याचं लोण संभाजीनगरात, १५० जणांना TWJ कंपनीने कोट्यवधीला गंडवलं, वाचा घटनाक्रम

या मारहाणीत आईचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेची माहिती गावातील नागरिकांनी पोलिसांना दिली. यानंतर पोलीस तात्काळ मूल गावात आले आणि नराधम जगदीश पेटकुलेला अटक केली. रात्री दारूच्या नशेत त्याने हे क्रूर कृत्य केले. घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच मूल पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com