Railway Block : मध्य रेल्वेवर मंगळवारी १२ तासांचा मेगा ब्लॉक; अनेक गाड्यांच्या वेळेत बदल, घराबाहेर पडण्याआधी वाचा वेळापत्रक

Railway Mega Block : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात ८ सप्टेंबरला १२ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. जळगाव–शिरसोली–म्हसावद मार्गावरील वाहतूक प्रभावित होणार असून काही मेमू गाड्या रद्द आणि एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
Railway Mega Block News
Railway Mega Block NewsAI Image
Published On
Summary
  • जळगाव–शिरसोली–म्हसावद दरम्यान १२ तासांचा मेगा ब्लॉक

  • स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली बसवली जाणार

  • अनेक मेमू गाड्या रद्द

  • एक्स्प्रेसच्या वेळेत बदल

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव–शिरसोली–म्हसावद दरम्यानच्या अप आणि डाऊन मार्गावर मंगळवारी, ८ सप्टेंबर रोजी तब्बल १२ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ६ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा ब्लॉक राहणार असून, या कालावधीत रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना रेल्वेच्या वेळापत्रकाची माहिती घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या मेगा ब्लॉकदरम्यान रेल्वे मार्गावर स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली बसवण्याचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात येणार आहे. रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने हे काम करण्यात येत आहे. मात्र, कामासाठी दोन्ही मार्गांवरील वाहतूक काही काळ नियंत्रित करावी लागणार असल्याने अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.

Railway Mega Block News
Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! निवृत्तीचे वय आता ६२, महाराष्ट्रासह ७ राज्यांमध्ये नियम बदलणार

ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी–भुसावळ, भुसावळ–देवळाली आणि नाशिक रोड–बडनेरा मेमू या गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा विचार करावा लागणार आहे. याशिवाय अजनी–पुणे वंदे भारत एक्सप्रेस आणि भुसावळ–दादर एक्सप्रेसच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. त्यामुळे या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी नेहमीच्या वेळेवर अवलंबून न राहता सुधारित वेळापत्रक तपासणे आवश्यक आहे.

Railway Mega Block News
Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी ३० दिवस आधी शरीरात दिसतील 'ही' ६ लक्षणे; दुर्लक्ष करू नका नाहीतर....

मेगा ब्लॉकचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही होणार आहे. अमृत भारत एक्सप्रेससह अनेक महत्त्वाच्या गाड्या विविध स्थानकांवर सुमारे दोन ते तीन तास थांबवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या प्रवासाला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागू शकतो. रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः सकाळच्या वेळेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी गाडी रद्द झाली आहे का किंवा वेळेत बदल झाला आहे का, याची खात्री करूनच प्रवास करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com