Railway News : मध्य रेल्वेच्या १४ स्थानकांवर या ५ दिवसांसाठी प्लॅटफॉर्म तिकीट बंदी, काय आहे कारण?

Indian Railway Update: मध्य रेल्वेच्या १४ स्टेशनवर ५ दिवसांसाठी प्लॅटफॉर्म तिकीटावर बंदी घालण्यात आली आहे. वर्षच्या अखेरीस काही अनुचित घडू नये, तसेच सुट्टी आणि वर्ष अखेरीस जमणारी गर्दी टाळण्यासाठी रेल्वेनं हा मोठा निर्णय घेतला आहे.
Central Railway
Central RailwaySaam TV
Published On

मध्य रेल्वे संदर्भात एक मोठी बातमी आहे. वर्षाच्या अखेरीस होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य १४ स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध घालण्यात आले आहे. वर्षाच्या अखेरीस काही अनुचित घडू नये, तसंच सुट्टी आणि वर्ष अखेरीस जमणारी गर्दी टाळण्यासाठी रेल्वेनं हा मोठा निर्णय घेतला आहे.

प्लॅटफॉर्मवर होणार्‍या गर्दीचे व्यवस्थापन आणि स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करणे हे या निर्बंधाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे जर आपण काही कामानिमित्त प्लॅटफॉर्म तिकिट काढत असाल, तर त्याआधी ही बातमी जरूर वाचा. प्लॅटफॉर्म तिकिट विक्रीवर निर्बंध, नेमकं कोणत्या मध्य रेल्वे स्थानकावर असेल जाणून घेऊयात.

Central Railway
Railway Meghablock: रेल्वेचा एक दिवसाचा मेगाब्लॉक, कधी, कुठे आणि कसा?

मावळचे २०२४ वर्ष संपण्यासाठी आणि २०२५ हे वर्ष सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. वर्ष अखरीस गर्दी जमण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच मध्य रेल्वेनं एक मोठा निर्णय घेत प्लॅटफॉर्म तिकिट विक्रीवर निर्बंध घातले आहे. प्लॅटफॉर्म तिकिट विक्रीचे निर्बंध २९-१२-२०२४ ते ०२-०१-२०२५ च्या मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत लागू असेल.

Central Railway
Pushpa 2 Ticket Price : फक्त पुष्पा भाऊ... फर्स्ट डे शोच्या तिकिटाची किंमत वाचून धक्का बसेल

ज्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, पुणे, नागपूर, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, सोलापूर, कलबुरगि आणि लातूर या स्थानकांमध्ये प्लॅटफॉर्म तिकिट विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहे. तसेच जर वयोवृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, लहान मुले, निरक्षर व्यक्ती आणि महिला प्रवासी ज्यांना एकट्याने प्रवास करता येत नाही, अशा व्यक्तींचा प्रवास सुलभ व्हावा या हेतूनं निर्बंधांमधून सूट देण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com