मध्य रेल्वेवर ५ दिवसांचा विशेष पॉवर ब्लॉक; अनेक गाड्यांचे वेळापत्रक बदलले, जाणून घ्या टाइमटेबल

central railway mega block : मध्य रेल्वेवर ५ दिवसांचा विशेष पॉवर ब्लॉकची घोषणा करण्यात आलीये. यामुळे अनेक गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहेत.
Railway Mega Block
Railway Mega BlockSaam tv
Published On
Summary

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी

कसारा ते इगतपुरी भागात पॉवर ब्लॉकची घोषणा

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. मध्य रेल्वेवरील कसारा ते इगतपुरीच्या भागात ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) संबधित अडथळा दूर करण्यासाठी पूर्वतयारीच्या कामासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. विशेष पॉवर ब्लॉक हा २ जून २०२६ ते ५ जून २०२६ या कालावधीदरम्यान असणार आहे. मध्य रेल्वेने घोषित केलेल्या घोषणेमुळे अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

Railway Mega Block
हार्बर मार्गावरून लवकरच धावणार जलद लोकल; कसा असेल संपूर्ण प्रकल्प? महत्त्वाची माहिती समोर

ब्लॉकची तारीख आणि कालावधी काय?

पॉवर ब्लॉक हा २ जून २०२६ (मंगळवार) ते दिनांक ०५ जून २०२६ (शुक्रवार) पर्यंत १५.५० ते १७.५० वाजेपर्यंत म्हणजे दररोज दुपारी २ तासांच्या ब्लॉकची घोषणा केली आहे. अप लाईन, मिड लाईन, अप यार्ड लाईन, थळ घाट रिव्हर्सल केबिन आणि खर्डीदरम्यान प्लॅटफॉर्म २, ३ आणि ४ (दोन्ही स्थानके वगळून) असा ब्लॉक विभाग असणार आहे.

ब्लॉक कालावधीत आसनगाव आणि कसारादरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत. तसेच कालावधीत उपनगरीय गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून अनुक्रमे १३.१०, १४.१७ आणि १४.४६ वाजता सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कसारा लोकल N19, N21 आणि N23 आसनगाव येथेच शॉर्ट टर्मिनेट केल्या जाईल.

कोणत्या गाड्या कुठून सुटणार?

कसारा येथून १५.३५ वाजता सुटणारी N24 लोकल आसनगाव येथून १६.१२ वाजता सुटेल. कसारा येथून १६.१६ वाजता सुटणारी N26 लोकल आसनगाव येथून १६.५४ वाजता सुटेल. कसारा येथून १७.०२ वाजता सुटणारी N28 लोकल आसनगाव येथून १७.३९ वाजता सुटेल.

Railway Mega Block
Bharat Taxi: ओला उबरला देणार टक्कर! 'भारत टॅक्सी' सेवा मुंबईत सुरु; किती भाडे द्यावे लागणार? वाचा सविस्तर

शेवटची लोकल कोणती असणार?

कसारासाठी ब्लॉकच्या आधीची शेवटची उपनगरीय सेवा N17 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कसारा असेल, जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १२.३० वाजता सुटेल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठीची ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल N22 कसारा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल, जी कसारा येथून १४.४२ वाजता सुटेल.

कसारासाठीची ब्लॉकनंतरची पहिली लोकल N25 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कसारा असेल, जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १६.५० वाजता सुटेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठीची ब्लॉकनंतरची पहिली लोकल N30 कसारा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल, जी कसारा येथून १८.१७ वाजता सुटेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com