Ganpati Special Trains : गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी दिलासा; मध्य रेल्वेची २४६ विशेष रेल्वेंची घोषणा

Ganpati Special Trains : गणेशोत्सवात होणारी अतिरिक्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने २४६ विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली आहे. यामध्ये वातानुकूलित, शयनयान आणि अनारक्षित डब्यांसह १८४ विशेष गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय ६२ अनारक्षित विशेष रेल्वेही प्रवाशांच्या सेवेत धावणार आहेत.
Ganpati Special Trains : गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी दिलासा; मध्य रेल्वेची २४६ विशेष रेल्वेंची घोषणा
Ganpati Special Trains : गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी दिलासा; मध्य रेल्वेची २४६ विशेष रेल्वेंची घोषणाchatgpt
Published On

गणपतीसाठी मध्य रेल्वेने विशेष रेल्वेंची घोषणा केली आहे. चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्ये रेल्वेने गणपती विशेष रेल्वेंची व्यवस्था केली आहे.

मध्य रेल्वे द्वारा २४६ गणपती विशेष रेल्वेंची घोषणा वातानुकूलित /शयनयान/अनारक्षित डबे असलेली १८४ मिश्र विशेष रेल्वे आणि ६२ अनारक्षित विशेष ट्रेन

मध्य रेल्वे द्वारे येणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी २४६ गणपती विशेष रेल्वे चालवणार आहे. यामध्ये खालील रेल्वेंचा समावेश आहे:

• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या रेल्वे – ९८ सेवा

• लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या रेल्वे – ७६ सेवा

• पुणे येथून सुटणाऱ्या रेल्वे – १० सेवा

• अनारक्षित विशेष रेल्वे – ६२ सेवा

गणपती विशेष रेल्वेंचा तपशील:

१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सावंतवाडी रोड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दैनिक विशेष रेल्वे (३२ सेवा)

विशेष रेल्वे क्रमांक 01103 दिनांक ११.०९.२०२६ ते दिनांक २६.०९.२०२६ या कालावधीत दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १५.३० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी ०४.०० वाजता पोहोचेल. (१६ सेवा)

विशेष रेल्वे क्रमांक 01104 दिनांक १२.०९.२०२६ ते दिनांक २७.०९.२०२६ या कालावधीत दररोज सावंतवाडी रोड येथून ०४.३५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी १६.४० वाजता पोहोचेल. (१६ सेवा)

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, कामथे, सावरडा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

रेल्वेची संरचना: २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

Ganpati Special Trains : गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी दिलासा; मध्य रेल्वेची २४६ विशेष रेल्वेंची घोषणा
PUC Certificate: वाहनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता ३ वर्षांतून एकदाच करावी लागणार PUC टेस्ट; सरकारचा प्रस्ताव

२) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सावंतवाडी रोड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दैनिक विशेष रेल्वे (३४ सेवा)

विशेष रेल्वे क्रमांक 01151 दिनांक ११.०९.२०२६ ते दिनांक २७.०९.२०२६ या कालावधीत दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी १४.२० वाजता पोहोचेल. (१७ सेवा)

विशेष रेल्वे क्रमांक 01152 दिनांक ११.०९.२०२६ ते दिनांक २७.०९.२०२६ या कालावधीत दररोज सावंतवाडी रोड येथून १५.३५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०४.३५ वाजता पोहोचेल. (१७ सेवा)

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

रेल्वेची संरचना: २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

३) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - रत्नागिरी - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दैनिक विशेष रेल्वे (३२ सेवा)

विशेष रेल्वे क्रमांक 01153 दिनांक ११.०९.२०२६ ते दिनांक २६.०९.२०२६ या कालावधीत दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ११.३० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी २०.२५ वाजता पोहोचेल. (१६ सेवा)

विशेष रेल्वे क्रमांक 01154 दिनांक १२.०९.२०२६ ते दिनांक २७.०९.२०२६ या कालावधीत दररोज रत्नागिरी येथून ०४.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी १३.३० वाजता पोहोचेल. (१६ सेवा)

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, कामथे, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

रेल्वेची संरचना: २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

४) लोकमान्य टिळक टर्मिनस - सावंतवाडी रोड - लोकमान्य टिळक टर्मिनस दैनिक विशेष रेल्वे (३४ सेवा)

रेल्वे क्रमांक 01171 विशेष रेल्वे दिनांक ११.०९.२०२६ ते दिनांक २७.०९.२०२६ या कालावधीत दररोज लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०८.२० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी २१.०० वाजता पोहोचेल. (१७ सेवा)

रेल्वे क्रमांक 01172 विशेष रेल्वे दिनांक ११.०९.२०२६ ते दिनांक २७.०९.२०२६ या कालावधीत दररोज सावंतवाडी रोड येथून २२.३५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता पोहोचेल. (१७ सेवा)

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

रेल्वेची संरचना: २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

Ganpati Special Trains : गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी दिलासा; मध्य रेल्वेची २४६ विशेष रेल्वेंची घोषणा
२४ वर्षांनंतर जेव्हा मुलगा अचानक समोर आला... SIR यादीतील एका जुळलेल्या नावाने आईचे डोळे पाणावले

५) लोकमान्य टिळक टर्मिनस - सावंतवाडी रोड - लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि-साप्ताहिक चालवण्यात येणारी विशेष रेल्वे (८ सेवा)

रेल्वे क्रमांक 01131 विशेष रेल्वे दिनांक १७.०९.२०२६ ते दिनांक २७.०९.२०२६ या कालावधीत दर गुरुवारी आणि रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०८.४५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी २२.१० वाजता पोहोचेल. (४ सेवा)

रेल्वे क्रमांक 01132 विशेष रेल्वे दिनांक १७.०९.२०२६ ते दिनांक २७.०९.२०२६ या कालावधीत दर गुरुवारी आणि रविवारी सावंतवाडी रोड येथून २३.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ११.४५ वाजता पोहोचेल. (४ सेवा)

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

रेल्वेची संरचना: २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

६) लोकमान्य टिळक टर्मिनस - सावंतवाडी रोड - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष रेल्वे (४ सेवा)

रेल्वे क्रमांक 01129 विशेष रेल्वे दिनांक १५.०९.२०२६ आणि दिनांक २२.०९.२०२६ रोजी दर मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०८.४५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी २२.१० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

रेल्वे क्रमांक 01130 विशेष रेल्वे दिनांक १५.०९.२०२६ आणि दिनांक २२.०९.२०२६ रोजी दर मंगळवारी सावंतवाडी रोड येथून २३.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ११.४५ वाजता पोहोचेल. (२ सेवा)

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

डब्यांची संरचना: २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

७) लोकमान्य टिळक टर्मिनस - रत्नागिरी - लोकमान्य टिळक टर्मिनस (आठवड्यातून ५ दिवस) विशेष रेल्वे (२२ सेवा)

रेल्वे क्रमांक 01167 विशेष रेल्वे दिनांक १२.०९.२०२६ ते दिनांक २६.०९.२०२६ या कालावधीत दर मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी, शनिवारी आणि रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २१.०० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ०५.०० वाजता पोहोचेल. (११ सेवा)

रेल्वे क्रमांक 01168 विशेष रेल्वे दिनांक १३.०९.२०२६ ते दिनांक २७.०९.२०२६ या कालावधीत दर बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी, रविवारी आणि सोमवारी रत्नागिरी येथून १५.१५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ००.४० वाजता पोहोचेल. (११ सेवा)

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

डब्यांची संरचना: २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

८) लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक वातानुकूलित विशेष रेल्वे (४ सेवा)

रेल्वे क्रमांक 01165 वातानुकूलित विशेष रेल्वे दिनांक १५.०९.२०२६ आणि दिनांक २२.०९.२०२६ रोजी दर मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मध्यरात्री ००.४५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी १४.३० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

रेल्वे क्रमांक 01166 वातानुकूलित विशेष रेल्वे दिनांक १५.०९.२०२६ आणि दिनांक २२.०९.२०२६ रोजी दर मंगळवारी मडगाव येथून १६.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०७.१० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, मदुरे, थिवि आणि करमळी.

डब्यांची संरचना: १ वातानुकूलित प्रथम श्रेणी, ३ वातानुकूलित द्वितीय, १५ वातानुकूलित तृतीय,आणि २ जनरेटर व्हॅन्स.

९) लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष रेल्वे (४ सेवा)

रेल्वे क्रमांक 01185 विशेष दिनांक १६.०९.२०२६ आणि दिनांक २३.०९.२०२६ रोजी दर बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.४५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी १४.३० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

रेल्वे क्रमांक 01186 विशेष दिनांक १६.०९.२०२६ आणि दिनांक २३.०९.२०२६ रोजी दर बुधवारी मडगाव येथून १६.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०७.१० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, मदुरे (केवळ रेल्वे क्रमांक 01185 साठी), थिवि आणि करमळी.

डब्यांची संरचना: १ वातानुकूलित प्रथम श्रेणी, १ वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.

१०) पुणे - रत्नागिरी वातानुकूलित साप्ताहिक विशेष गाड्या (४ सेवा)

रेल्वे क्रमांक 01445 वातानुकूलित साप्ताहिक विशेष दर मंगळवार दिनांक १५.०९.२०२६ आणि दिनांक २२.०९.२०२६ रोजी पुणे येथून ००:२५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

रेल्वे क्रमांक 01446 वातानुकूलित साप्ताहिक विशेष दर मंगळवार दिनांक १५.०९.२०२६ आणि दिनांक २२.०९.२०२६ रोजी रत्नागिरी येथून १७:५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५:२० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

रेल्वेची संरचना: ३ वातानुकूलित द्वितीय, १५ वातानुकूलित तृतीय, १ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार.

११) पुणे - रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाड्या (६ सेवा)

रेल्वे क्रमांक 01447 साप्ताहिक विशेष दर शनिवार दिनांक १२.०९.२०२६, दिनांक १९.०९.२०२६ आणि दिनांक २६.०९.२०२६ रोजी पुणे येथून ००:२५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचेल. (३ सेवा)

रेल्वे क्रमांक 01448 साप्ताहिक विशेष दर शनिवार दिनांक १२.०९.२०२६, दिनांक १९.०९.२०२६ आणि दिनांक २६.०९.२०२६ रोजी रत्नागिरी येथून १७:५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५:२० वाजता पोहोचेल. (३ सेवा)

थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरावली रोड आणि संगमेश्वर रोड.

डब्यांची संरचना: २ वातानुकूलित द्वितीय, ४ वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार.

Ganpati Special Trains : गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी दिलासा; मध्य रेल्वेची २४६ विशेष रेल्वेंची घोषणा
२४ वर्षांनंतर जेव्हा मुलगा अचानक समोर आला... SIR यादीतील एका जुळलेल्या नावाने आईचे डोळे पाणावले

१२) दिवा – खेड – दिवा मेमू दैनंदिन अनारक्षित विशेष गाड्या (३२ सेवा)(दिनांक २२.०९.२०२६ रोजी वगळून)

रेल्वे क्रमांक 01155 मेमू विशेष रेल्वे दिनांक ११.०९.२०२६ ते दिनांक २७.०९.२०२६ या कालावधीत (दिनांक २२.०९.२०२६ रोजी वगळून) दिवा येथून ०७.१५ वाजता सुटेल आणि खेड येथे त्याच दिवशी १४.३५ वाजता पोहोचेल. (१६ सेवा)

रेल्वे क्रमांक 01156 मेमू विशेष रेल्वे दिनांक ११.०९.२०२६ ते दिनांक २७.०९.२०२६ या कालावधीत (दिनांक २२.०९.२०२६ रोजी वगळून) खेड येथून १६.०० वाजता सुटेल आणि दिवा येथे त्याच दिवशी २२.५० वाजता पोहोचेल. (१६ सेवा)

थांबे: निळजे, तळोजा पंचनद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजडी, विन्हेरे, दिवाणखवटी आणि कळंबणी बुद्रुक.

डब्यांची संरचना: १२ डब्यांची मेमू रॅक.

१३) दिवा – चिपळूण – दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष गाड्या (३० सेवा)

(दिनांक २३.०९.२०२६ /दिनांक २४.०९.२०२६ रोजी वगळून)

रेल्वे क्रमांक 01133 मेमू विशेष रेल्वे दिनांक ११.०९.२०२६ ते दिनांक २७.०९.२०२६ या कालावधीत दररोज (दिनांक २३.०९.२०२६ रोजी वगळून) दिवा येथून १३.४० वाजता सुटेल आणि चिपळूण येथे त्याच दिवशी २१.३० वाजता पोहोचेल. (१५ सेवा)

रेल्वे क्रमांक 01134 मेमू विशेष रेल्वे दिनांक १२.०९.२०२६ ते दिनांक २८.०९.२०२६ या कालावधीत दररोज (दिनांक २४.०९.२०२६ रोजी वगळून)चिपळूण येथून ०७.३० वाजता सुटेल आणि दिवा येथे त्याच दिवशी १३.०० वाजता पोहोचेल. (१५ सेवा)

थांबे: निळजे, तळोजा पंचनंद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजणी.

डब्यांची संरचना: 12 कार मेमू रेक

आरक्षण" . गणपती विशेष आरक्षित गाड्यांसाठीचे आरक्षण सर्व पीआरएस केंद्रांवर आणि आयआरसीटीसी च्या संकेतस्थळावर (www.irctc.co.in) खालीलप्रमाणे सुरू होईल: -

दिनांक ०१.०८.२०२६ रोजी रेल्वे क्रमांक 01153, 01445, 01167 आणि 01447 साठी

दिनांक ०२.०८.२०२६ रोजी रेल्वे क्रमांक 01165 आणि 01185 साठी;

दिनांक ०३.०८.२०२८ रोजी रेल्वे क्रमांक 01103, 01129, 01151, 01171 आणि 01131 साठी.

सामान्य दरांसह अनारक्षित डब्यांचे आरक्षण यूटीएस प्रणालीद्वारे करता येईल.

तिकीट आरक्षणासाठी प्रवासी 'रेलवन' ॲप देखील डाउनलोड करू शकतात.

या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा एनटीइएस ॲप डाउनलोड करा.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com