Jammu Kashmir : जम्मू- काश्मीरच्या दहशतवादी हल्ल्यांवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; १८०० अतिरिक्त सीआरपीएफ जवान तैनात करणार

सीआरपीएफच्या १८ तुकड्या तैनात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
Jammu Kashmir
Jammu Kashmir Saam TV
Published On

Jammu Kashmir : जम्मू-कश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात दहशतवादी हल्ले होत आहेत. त्यामुळे सीआरपीएफच्या १८ तुकड्या तैनात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यात एकूण १८०० जवान पूंछ आणि राजौरी जिल्ह्यात आपलं कर्तव्य बजावणार आहेत. (Latest Jammu Kashmir News)

जम्मू कश्मीरच्या राजौरी जिल्हयात दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातला आहे. पूंछ जिल्ह्यात देखील दहशतवादी हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. राजौरीमध्ये लागोपाठ दोन दहशतवादी हल्ले झाले आहेत. यात ६ लोकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तसेच दोन अल्पवयीन चुलत भावांना यात आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळेच क्रेंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Jammu Kashmir
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये हिमस्खलनात ३ जवान शहीद

रविवारी सायंकाळी देखील तीन घरांवर दहशतवादी हल्ले करण्यात आले होते. या हल्ल्यांत चार नागरिक ठार झाले. तसेच ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांकडून होत असलेल्या हल्ल्यांनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने तात्काळ पावलं उचलत या ठिकाणी अतिरिक्त जवान पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या राजौरी आणि पूंछ येथे घेराबंदी आणि दहशतवाद्यांचा शोध घेणे सुरू आहे.

Jammu Kashmir
Firing in Jammu Kashmir : मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा गोळीबार; ३ नागरिकांचा मृत्यू, ७ जखमी

दहशतवादी हल्ल्यांमुळे राजौरीमध्ये मंगळवार आणि बुधवार सलग दोन दिवस बंद ठेवण्यात आला होता. तसेच जम्मूमध्ये नागरिकांकडून रस्त्यावर उतरत निदर्शने करण्यात आली. पूंछ येथील नागरिक देखील मोठ्या प्रमाणावर बंदमध्ये सहभागी झाले होते. सर्वत्र दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com