Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये हिमस्खलनात ३ जवान शहीद

कुपवाडा जिल्ह्यातील माच्छिल सेक्टरमध्ये शुक्रवारी हिमस्खलनात तीन जवानांना प्राण गमवावे लागले आहे.
indian army
indian army saam tv
Published On

Avalanche in Kupwara : जम्मू-कश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दुर्देवी घटना घडली आहे. कुपवाडा जिल्ह्यातील माच्छिल सेक्टरमध्ये शुक्रवारी हिमस्खलनात तीन जवानांना प्राण गमवावे लागले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तिन्ही जवान हे माच्छिल सेक्टरमध्ये कर्तव्यावर होते. अचानक झालेल्या हिमस्खलनात तिन्ही जवानांच्या अंगावर बर्फाचा थर कोसळला. यामध्ये तिन्ही जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

कुपवाडा जिल्ह्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेत भारतीय तीन जवान शहीद झाले आहे. या घटनेत गनर सौविक हजरा (२२), लांस नायक मुकेश कुमार (२२), नायक मनोज लक्ष्मण राव गायकवाड (४५) यांचा मृत्यू झाला आहे.

सैन्य दलाच्या (Indian Army) प्रवक्त्याने माच्छिल सेक्टरच्या अलमोरा पोस्टजवळ शुक्रवारी गस्तीवर असताना अचानक जवानांच्या बर्फाचा थर अंगावर कोसळला. यात दुर्दैवी घटनेत तीन जवानांना प्राण गमवावे लागले. घटनेनंतर सुरक्षा दलाच्या पथकाने बचाव कार्य सुरू केले. त्यांनी तिन्ही जवानांचे बर्फातून बाहेर काढले, त्याआधीच तिन्ही जवानांचा मृत्यू झाला.

indian army
Airplane Accident: विमानाची ट्रकला धडक, रनवेवर बर्निंग प्लेनचा थरार; पाहा VIDEO

कुपवाडा जिल्ह्यातील एसएसपी युगल मन्हास यांनी घटनेची पुष्टी करत प्रतिक्रिया दिली आहे. ' माच्छिल क्षेत्रात दुर्दैवी घटना घडली आहे. हिमस्खलनात सैन्य दलाचे ५६ राष्ट्रीय रायफल्सचे तीन जवान कर्तव्यावर असताना शहीद झाले. तिघांचे मृतदेह बर्फाच्या थरातून बाहेर काढण्यात आले आहे'.

धुळ्याचे सुपुत्राला जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण

धुळ्याचे सुपुत्र ४१ वर्षीय मनोज गायकवाड यांना जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण आलं आहे. मागील १५ वर्षांपासून देशसेवा करत होते. गस्तीदरम्यान त्यांच्यावर बर्फाचा कडा कोसळला. त्यावेळी तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com