Kolhapur News: भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू; केंद्र सरकारनेही घेतली घटनेची दखल

Girl Death Due To Rabies: कोल्हापूरमध्ये रेबीजमुळे एका तरूणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आता या प्रकरणाची केंद्रीय तज्ञ चौकशी करणार आहेत.
Girl Death Due To Rabies
Girl Death Due To RabiesSaam Tv
Published On

Latest Kolhapur News

कोल्हापूरमध्ये मोकाट कुत्र्याने चावा घेतल्यामुळे रेबीज होऊन कोल्हापुरातील तरुणीचा मागील महिन्यात मृत्यू झाला ( Dog Bite) होता. केंद्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी दिल्लीतील राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्राचे दोन वरिष्ठ शास्त्रज्ञांचे पथक चौकशीसाठी आज कोल्हापुरमध्ये येत आहे.  (Latest Marathi News)

3 फेब्रुवारी रोजी कोल्हापुरामधील भाऊसिंगजी रोडवर मोकाट कुत्र्याने 20 ते 22 जणांचा चावा घेतला होता. त्यात सृष्टी सुनील शिंदे या 21 वर्षीय तरुणीचा समावेश होता. तिच्यावर सुरुवातीला एका खाजगी रुग्णालयमध्ये उपचार देखील करण्यात (Girl Death Due To Rabies) आले होते. तपासणी केली असता तिला रेबीज झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळं 3 मार्च रोजी तिला छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल केलं होतं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रेबीजमुळे तरुणीचा मृत्यू

त्याच दिवशी तिची प्रकृती गंभीर झाली. उपचार सुरू असताना 4 मार्च रोजी पहाटे सृष्टीचा मृत्यू झाला होता. कोल्हापुरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. ते नागरिकांवर हल्ले देखील करत (Kolhapur News) आहेत. मोकाट कुत्रा चावल्यामुळे सृष्टी सुनील शिंदे हिचा रेबीजने मृत्यू झालाय. याची गंभीर दखल राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने घेतली आहे.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन सदस्यांची पथक कोल्हापुरात पाठवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. आज हे पथक कोल्हापुरमध्ये दाखल होत आहे. केंद्रीय तज्ञ रेबीजमुळे तरुणीचा मृत्यू झाला होता, या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.

Girl Death Due To Rabies
Beed Dog Attack : बीड जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ; दिवसाला 33, तर महिन्याला 1 हजार जणांचे तोडले लचके

कुत्रा चावल्यानंतर काय काळजी घ्यावी?

कुत्रा चावल्यानंतर रेबीज टाळण्यासाठी प्रथमोपचार म्हणून जखम स्वच्छ धुवावी. त्यानंतर कुत्रा चावलेल्या जागेवर त्वरीत निर्जंतुक पट्टी बांधावी. रुग्णाला तातडीने जवळच्या डॉक्टरांकडे उपचारासाठी (Rabies Symptoms) न्यावं. कुत्रा चावल्यानंतर रेबीज होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे दिरंगाई न करता लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधावा.

कुत्रा चावल्यानंतर रेबीज टाळण्यासाठी 24 तासांच्या आतमध्ये इंजेक्शन घेणं गरजेचं आहे. कुत्रा चावला तर पाच इंजेक्शन्स घ्यावी लागतात. पहिलं इंजेक्शन कुत्रा चावल्यानंतर 24 तासांच्या आतमध्ये घ्यावं लागतं. दुसरं इंजेक्शन कुत्रा चावल्यानंतर तिसऱ्या दिवशी दिलं (Death Due To Rabies) जातं. तिसरं इंजेक्शन कुत्रा चावल्यानंतर सातव्या दिवशी देतात. कुत्रा चावल्यानंतर चौथं इंजेक्शन हे 14 व्या दिवशी दिलं जातं. कुत्रा चावल्यानंतर पाचवं इंजेक्शन 28 व्या दिवशी देतात.

Girl Death Due To Rabies
Stray Dog in Kalyan : निर्माणाधीन इमारतीच्या १८ मजल्यावर अडकलेल्या कुत्र्याची ४८ तासानंतर सुटका, कल्याणमधील घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com