Stray Dog in Kalyan : निर्माणाधीन इमारतीच्या १८ मजल्यावर अडकलेल्या कुत्र्याची ४८ तासानंतर सुटका, कल्याणमधील घटना

Stray Dog in Kalyan News : इमारतीच्या १८ व्या मजल्यावर डकमध्ये एक भटका कुत्रा अडकला होता. या कुत्र्याची तब्बल 48 तासानंतर या भटक्या श्वानाची सुटका पॉज या प्राणीमित्र संघटनेने सुटका केली.
Stray Dog in Kalyan
Stray Dog in KalyanSaam tv
Published On

अभिजीत देशमुख, कल्याण

Kalyan Stray Dog Latest News :

कल्याण पश्चिमेकडील गांधारी येथील एका इमारतीच्या १८ व्या मजल्यावर डकमध्ये एक भटका कुत्रा अडकला होता. तब्बल 48 तासानंतर या भटक्या कुत्र्याची सुटका पॉज या प्राणीमित्र संघटनेने सुटका केली. (Latest Marathi News)

प्लांट अँड एनिमल वेल्फेअर सोसायटी पॉजचे प्रमुख निलेश भणगे यांनी गांधारी येथील एका इमारतीच्या 18 व्या मजल्यावरील डकमध्ये एक कुत्रा अडल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या श्वान पथकाला ही माहिती दिली. याबाबत माहिती मिळताच श्वान पथकाचे कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. त्यानंतर या भटक्या कुत्र्याला त्या ठिकाणाहून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो कुत्रा कर्चचाऱ्यांना चावला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Stray Dog in Kalyan
HSC Exam paper Leak : बारावीचा बायोलॉजीचा पेपर फुटला; महाराष्ट्रात खळबळ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

कुत्रा चावल्यामुळे पथकाने त्याला बाहेर काढण्याऐवजी त्या ठिकाणाहून निघून जाणे पसंत केले. गेल्या दोन दिवसांपासून कुत्रा उपाशी असल्याने प्रचंड भुंकत होता. त्याला इमारतीमधील नागरिकांनी जेवण दिले. त्यानंतर या कुत्र्याचे भुंकणे बंद झाले. या कुत्र्याला बाहेर काढण्यासाठी पॉज या संस्थेची तज्ज्ञ टीममधील कार्यकर्ते देवेंद्र निलाखे आणि जयश्री काळे यांनी इमारतीचा १८ वा मजला गाठला. त्यानंतर या कुत्र्याला बाहेर काढत त्याची सुटका केली.

बीड जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ

बीडमध्ये भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील मोकाट कुत्र्यांनी तब्बल 12 हजार 939 जणांचा चावा घेत जखमी केले होते. यानंतर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे. भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेल्यांमध्ये महिला आणि मुलांचा सामावेश अधिक आहे.

Stray Dog in Kalyan
Hindkesari Manya: १०० तोळे सोनं, ७९ बुलेट, १५० बाईक अन् बरंच काही; मन्या बैलाची बक्षिसांची यादी वाचून थक्क व्हाल!

भटक्या कुत्र्यांवर हायकोर्टाची टिप्पणी

रस्त्यावर भटक्या कुत्र्यांना आवर घालण्याच्या मुद्द्यांवर केरळ हायकोर्टाने मोठी टिप्पणी केली आहे. भटक्या कुत्र्यांपेक्षा माणसांना प्राधान्य द्यायला पाहिजे. भटके कुत्रे लोकांसाठी धोकादायक आहेत. प्राणीप्रेमींनी प्रिंट आणि मीडियामध्ये लिहिण्यापेक्षा स्थानिक पालिकांना मदत करण्यासाठी पुढे यायला हवं, असं केरळ हायकोर्टाने म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com