Beed Dog Attack : बीड जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ; दिवसाला 33, तर महिन्याला 1 हजार जणांचे तोडले लचके

Dog Attack News : जानेवारी 2023 ते फेब्रुवारी 2024 या 14 महिन्यांच्या काळात 14 हजार 221 जणांचे मोकाट कुत्र्यांनी लचके तोडले आहेत. जिल्ह्यातील हे प्रमाण आश्चर्यचकित करणारे आहे.
Beed Dog Attack
Beed Dog AttackSaam TV
Published On

Beed News :

बीड जिल्ह्यासह शहरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. मागील वर्षभरात जिल्ह्यातील मोकाट कुत्र्यांनी तब्बल 12 हजार 939 जणांचा चावा घेत त्यांना गंभीर जखमी केले आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे. कुत्र्याने चावा घेतलेल्यांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश जास्त आहे.

Beed Dog Attack
Beed News: अनैतिक संबंधातून पोटच्या मुलाला संपवलं, नंतर रचला मृत्यूचा बनाव; निर्दयी आईचं असं फुटलं बिंग

जानेवारी 2023 ते फेब्रुवारी 2024 या 14 महिन्यांच्या काळात 14 हजार 221 जणांचे मोकाट कुत्र्यांनी लचके तोडले आहेत. जिल्ह्यातील हे प्रमाण आश्चर्यचकित करणारे आहे. श्वानदंशामुळे रेबीज आजाराची भीती असते. रेबीजचे विषाणू कुत्र्याच्या लाळेतून संक्रमित होत असतात. कोणत्याही प्राण्याने चावा घेतल्यानंतर लाळेचे संक्रमण रक्तात होऊ नये, यासाठी जखम धुणे गरजेचं असल्याचं प्रथमोपचार आरोग्यतज्ज्ञ सांगत आहेत.

दरम्यान, कोणत्याही वन्यप्राण्याने चावा घेतल्यास याकडे दुर्लक्ष करू नये, यासाठी आवश्यक त्या लस शासकीय रुग्णालयांत उपलब्ध आहेत. प्राण्याने चावा घेतल्यानंतर सर्वप्रथम ती जखम धुवावी, तसेच जवळच्या रुग्णालयात दाखल व्हावे, प्राण्यांच्या लाळेतून भविष्यात संक्रमण होण्याची भीती असते.

कुत्र्यांच्या हल्ल्यात ८ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

दोन दिवसांपूर्वीच यूपीमध्ये देखील अशीच एक घटना घडली होती. कुत्र्यांच्या हल्ल्यात एका ८ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हा मुलगा इयत्ता तिसरीत शिकत होता. घराबाहेर पडला तेव्हा मोकाट कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला करत त्याच्या हातापायांचे लचके तोडले, या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. दुर्दैवाने त्याचा यामध्ये मृत्यूही झाला. या घटनेनं संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त केली जातेय.

Beed Dog Attack
Dharashiv Crime News : धाराशिव पोलिसांची कामगिरी, घरफोडीतील एकासह सात जण अटकेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com