Vishal Gangurde
उत्तर प्रदेशमध्ये रेबीजमुळे १४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याच जीवघेण्या रेबीजची माहिती जाणून घेऊया
प्राणघातक रेबीज हा कुत्र्याचे चावणे आणि चाटण्यानेही होतो.
जीवघेण्या रेबीजचा विषाणू प्राण्याच्या लाळेद्वारे लोकांमध्ये पसरतात.
रेबीजच्या सुरक्षितेसाठी रेबीजची लस घेणे आवश्यक आहे.
रेबीज झाल्यास ताप, उलट्या, मळमळ, चिंता, डोकेदुखी, अन्न गिळण्यास त्रास होणे, निद्रानाश आणि अर्धांगवायू अशी लक्षणे दिसू लागतात.
तुम्हाला कोणत्याही प्राण्याने चावा घेतल्यास तातडीने डॉक्टरचा सल्ला घ्या.
भटके कुत्रे, वन्य प्राण्यांच्या अधिक जवळ जाणे टाळा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी आपल्या डॉक्टरांसोबत संपर्क साधा.