- राजेश भोस्तेकर
रायगड : स्वराज्याचे पहिले युवराज आणि दुसरे छत्रपती शिवपुत्र संभाजी महाराज यांच्या राज्याभिषक दिनाचा ३४८ वा वर्धापन दिन आज (साेमवार) मोठ्या उत्साहात किल्ले रायगडावर साजरा करण्यात आला. तिथीनुसार माघ शुद्ध सप्तमीला संभाजी राजांचा राज्याभिषेक झाला होता. महाडमधील (mahad) छत्रपती संभाजी महाराज (chhatrapati sambhaji maharaj) राज्याभिषेक दिनोत्सव समिती गेली चार वर्ष हा महोत्सव साजरा करीत आहे. यावेळी शिवप्रेमींनी शिवकालीन वेषभुषा परीधान करून जल्लोष साजरा केला. ब्रह्मवृदाचे मंत्रोच्चार आणि शिवप्रेमींच्या जयघोषाच्या घोषणांच्या साथीने हा सोहळा पार पडला.
ढोल ताशाच्या तालावर तरुण तरुणींनी मर्दांनी खेळांचे प्रात्याक्षिक सादर केले. मान्यवरांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या प्रतिमेवर सप्तसिंधूंचे जल, फुल आणि चलनातील नाण्यांचा अभिषेक करण्यात आला. शिवप्रभुंची आरती आणि पालखी मिरवणुकीने या राज्याभिषेक सोहळ्याची सांगता करण्यात आली.
रायगडवरील (raigad) कार्यक्रमांमध्ये सरकारी अधिकारी उपस्थित नसतात. पुरातत्व विभागाचे अधिकारी देखील समोर येत नाहीत. रायगडवरील कार्यक्रमांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीसाठी शासन निर्णय काढावा लागणार असल्याचे मत महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.