Chandrapur Accident News: साखर झोपेत काळाचा घाला; बसचा भीषण अपघात, २ ठार १७ जखमी

अपघात इतका भीषण होता की, यात प्रवाशांनी भरलेली बस पूर्ण पलटी झाली.
Chandrapur Accident News
Chandrapur Accident Newssaam tv

Chandrapur Accident News: चंद्रपूर येथे मध्यरात्री प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १७ जण गंभीर जखमी झाले असून २ प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यात प्रवाशांनी भरलेली बस पूर्ण पलटी झाली. (Latest Accident News)

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांना घेऊन ही खाजगी बस हैदराबाच्या दिशेने जात होती. चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यातील विरूर-धानोरा येथे थोड्या अंतरावर अचानक वाहन चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्यावर पलटी झाली. या घटनेत जखमी प्रवाशांना विरुर, राजुरा आणि चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Chandrapur Accident News
Solapur Accident : आजाेबांच्या डाेळ्यांदेखत नातवाचा ट्रकच्या चाकाखाली मृत्यू; आठवड्यातील दुसरी घटना

दरम्यान यातील काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजलं आहे. सदर घटनेची माहिती मिळताच विरूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक माहितीनुसार, वाहन चालकाने झोपेत डुलकी घेतल्याने हा अपघात झाला असावा असं म्हटलं जात आहे. पोलीस या घटनेत अधिक तपास करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com