Accident News : महाराष्ट्र एक्सप्रेसची भीषण धडक; महिलेसह 15 शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू, परिसरात हळहळ

Maharashtra Buldhana Train Accident News : बुलढाण्यात महाराष्ट्र एक्सप्रेसच्या धडकेत ५८ वर्षीय लताबाई सांगळकर आणि १५ शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलीस पुढील तपास करत आहेत.
BULDHANA RAIL ACCIDENT: WOMAN AND 15 GOATS KILLED AFTER MAHARASHTRA EXPRESS COLLISION
BULDHANA RAIL ACCIDENT: WOMAN AND 15 GOATS KILLED AFTER MAHARASHTRA EXPRESS COLLISIONSaam Tv
Published On
Summary
  • एक्सप्रेसच्या धडकेत महिलेचा मृत्यू

  • अपघातात १५ शेळ्यांचाही जागीच मृत्यू

  • भरकटलेल्या शेळ्यांना परत आणताना प्रसंग घडला

  • रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला

संजय जाधव, बुलढाणा

Buldhana Maharashtra Express Train Accident News बुलढाण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील नांदुरा-मलकापूर रेल्वेमार्गावर दुर्दैवी अपघात घडला आहे. महाराष्ट्र एक्सप्रेसच्या धडकेत एका महिलेसह १५ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना खुमगाव बुरटी रेल्वे स्थानकाजवळ घडली. या दुर्घटनेमुळे सांगळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खुमगाव बुरटी (Khumgaon Burti Railway Station ) परिसरातील रहिवासी असलेल्या ५८ वर्षीय लताबाई सांगळकर या नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्या चारण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास काही शेळ्या रेल्वे रुळाच्या दिशेने गेल्याचे त्यांना समजलं. शेळ्यांना परत सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी त्या रेल्वे रुळाजवळ पोचल्या. मात्र याचवेळी भरधाव वेगाने धावणारी महाराष्ट्र एक्सप्रेस त्या मार्गावरून येत होती.

BULDHANA RAIL ACCIDENT: WOMAN AND 15 GOATS KILLED AFTER MAHARASHTRA EXPRESS COLLISION
Petrol Diesel : केंद्र सरकारची मोठी घोषणा! पेट्रोल-डिझेलवरील करात कपात; १ जूनपासून नवे नियम लागू

रेल्वेगाडी येत असल्याची कल्पना येण्यापूर्वीच लताबाई सांगळकर यांना गाडीची जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याच अपघातात रेल्वे रुळावर असलेल्या १५ शेळ्यांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, स्थानिक पोलीस आणि नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच या प्रकरणी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

BULDHANA RAIL ACCIDENT: WOMAN AND 15 GOATS KILLED AFTER MAHARASHTRA EXPRESS COLLISION
Monsoon Update : मान्सून लांबणीवर, पण राज्यात आज वादळी पावसाची शक्यता; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

दुर्घटनेनंतर काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. लताबाई सांगळकर या कुटुंबाचा आधार होत्या. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे. दरम्यान, रेल्वे मार्ग ओलांडताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या दुर्घटनेने पुन्हा एकदा रेल्वे रुळांच्या परिसरात सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित केले असून अशा घटना टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com