Buldhana : पोस्टात बॉम्बची धमकी, स्फोटानं उडवून देणार असल्याचा मेल आल्यानं प्रशासनात खळबळ

Buldhana Post Office News : बुलढाणा पोस्ट ऑफिसला आलेल्या बॉम्बस्फोटाच्या धमकीच्या ई-मेलमुळे प्रशासन सतर्क झाले. BDDS तपासणीत कोणतेही स्फोटक आढळले नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Buldhana : पोस्टात बॉम्बची धमकी, स्फोटानं उडवून देणार असल्याचा मेल आल्यानं प्रशासनात खळबळ
Buldhana Post Office NewsSaam Tv
Published On
Summary
  • बुलढाण्यात पोस्ट ऑफिसला बॉम्ब धमकीचा ई-मेल

  • १६ RDX बॉम्बस्फोटांचा इशारा दिला होता

  • BDDS तपासणीत काहीही संशयास्पद आढळले नाही

  • पोलिसांकडून तपास सुरू, नागरिकांना घाबरू नये आवाहन

संजय जाधव, बुलढाणा

बुलढाणा शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसला आलेल्या एका धक्कादायक ई-मेलमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बॉम्बस्फोट घडवून आणण्याची माहिती ई-मेलमध्ये दिली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिनाभरात दुसऱ्यांदा अशा प्रकारची धमकी मिळाल्याने सुरक्षेच्या दृष्टीने यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

संबंधित ई-मेलमध्ये राज्यातील सर्व पासपोर्ट आणि टपाल कार्यालयांमध्ये दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तब्बल १६ आरडीएक्स बॉम्बस्फोट घडवून आणण्याची गंभीर धमकी देण्यात आली होती. “तात्काळ सर्वांना बाहेर काढा” असा इशाराही या मेलमध्ये देण्यात आला होता, त्यामुळे प्रशासनाने याची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली.

Buldhana : पोस्टात बॉम्बची धमकी, स्फोटानं उडवून देणार असल्याचा मेल आल्यानं प्रशासनात खळबळ
Shocking : २ बायकांपासून १८ मुलं, तरीही माजी सरपंच तिसरीच्या प्रेमात पडला, गर्लफ्रेंडने भेटायला बोलावून केलं भयंकर कृत्य

या घटनेनंतर पोस्ट प्रशासनाने तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनीही विलंब न करता तपासयंत्रणा सक्रिय करत घटनास्थळी धाव घेतली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाला (BDDS) पाचारण करण्यात आले आणि संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात आली.

Buldhana : पोस्टात बॉम्बची धमकी, स्फोटानं उडवून देणार असल्याचा मेल आल्यानं प्रशासनात खळबळ
Shocking : २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, आईच्या लिव्ह-इन पार्टनरचं भयंकर कृत्य, पीडिता गरोदर राहिली

सखोल तपासणीनंतर कोणताही स्फोटक पदार्थ आढळून आला नसल्याचे स्पष्ट झाले असून, “घाबरण्याचे कोणतेही कारण नाही” असा निर्वाळा BDDS पथकाने दिला आहे. दरम्यान, पोस्ट विभागाकडून नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले असून सर्व आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी पोस्ट ऑफिसचे नियमित कामकाज सुरळीत सुरू असल्याचे पोस्टमास्तर आशिष इंगळे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com