Satish Bhosale : खोक्याचा आणखी एक प्रताप; बुलढाणा पोलिसांनी घेतलं ताब्यात, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Satish Bhosale News : खोक्याने बुलढाण्यातील एकाला मारहाण केली होती. खोक्याने बॅटने मारहाण केली होती. या प्रकरणी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Satish Bhosale News
Satish BhosaleSaam tv
Published On

योगेश काशिद, साम टीव्ही

बीड : खोक्याने बुलढाणा जिल्ह्यातील कैलास वाघ या व्यक्तीला बॅटने मारहाण केली होती. खोक्या मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल झाला होता. याच प्रकरणी सतीश भोसले उर्फ खोक्याला चकलांबा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाची दखल घेत स्वतः पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

Satish Bhosale News
Prashant koratkar : कोर्टाचा दणका, प्रशांत कोरटकर फरार; पोलीस मुसक्या कधी आवळणार?

शिरूर येथील ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी खोक्याला सात दिवसांची पोलीस कोठडी झाली होती. त्यानंतर काल न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आज जिल्हा कारागृहातून खोक्याला चकलांबा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता क्रिकेटच्या बॅटने मारहाण केलेल्या गुन्ह्यात चकलांबा पोलीस त्याची चौकशी करणार आहे.

Satish Bhosale News
Shocking : खळबळजनक! माजी मंत्र्यांच्या सूनेची हत्या; बेडरुममध्ये पती आणि बॉयफ्रेंडची दारु पार्टी, अचानक...

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सतीश उर्फ खोक्या भोसले याने बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील कैलास वाघ नावाच्या व्यक्तीला बॅटच्या सहाय्याने अमानुष मारहाण केली होती. यानंतर पोलिसांनी स्वतः समोर येत सुमोटोनुसार पोलिसांनी फिर्यादी होत सतीश उर्फ खोक्या भोसले याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर चकलांबा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

तिंतरवाणी येथे कैलास वाघ याला एका शाळेमध्ये अमानुषपणे क्रिकेटच्या बॅटच्या साह्याने मारहाण केली होती. यानंतर सतीश उर्फ खोक्या भोसले आणि इतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Satish Bhosale News
Pakistan blast : पाकिस्तान हादरलं! मशिदीत नमाज अदा करताना मोठा स्फोट, अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता

बावी येथील ढाकणे पिता-पुत्रांना अमानुष मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी सतीश उर्फ खोक्या भोसलेला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. ती पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालय कोठडी मिळाली. आता खोक्याचा दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये चकलांबा पोलिसांनी ताबा घेतला आहे. त्याला उद्या गेवराई येथील न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com