Pakistan blast : पाकिस्तान हादरलं! मशिदीत नमाज अदा करताना मोठा स्फोट, अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता

Pakistan blast update : पाकिस्तानच्या मशिदीत स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Pakistan
Pakistan blast update Saam tv
Published On

पाकिस्तान पुन्हा एकदा स्फोटाने हादरलं आहे.पाकिस्तानच्या पेशावरमध्ये नमाज अदा करताना मोठा स्फोट झाला. किस्साखानी बाजाराच्या जामा मशिदीत स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. स्फोटादरम्यान मशिदीत अनेक जण नमाज अदा करत होते.

Pakistan
Crime News: लग्नाचे आमंत्रण दिले नाही, नाराज मित्रांनी नवरदेवाचं घर गाठलं; वडिलांना मारहाण करत गोळी झाडली

स्फोट झाल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि सुरक्षादलाच्या जवानांनी बचावकार्य सुरु केलं आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही. पेशावरमध्ये याआधी देखील दहशतवादी हल्ला झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, फेब्रुवारी महिन्यात दहशतवादी हल्ल्यात ७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सर्वाधिक हल्ले बलूचिस्तानमध्ये झाले आहेत. काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी बलूचिस्तानमध्ये जाफर एक्स्प्रेस ट्रेन हायजॅक केली होती.

दहशतवाद्यांचा नवा अड्डा

इस्लामाबाद येथील मीडिया रिपोर्टनुसार, फेब्रुवारी महिन्यात ५४ दहशतवादी हल्ले झाले आहेत. त्यात १२१ लोकांचा मृत्यू झाला होता. तर १०३ लोक जखमी झाले होते. ६२ टक्के लोकांचा बलूचिस्तानमध्ये मृत्यू झाला आहे. बलूचिस्तान दहशतवाद्यांचं केंद्र होऊ लागलं आहे.

Pakistan
Titwala Crime: होळी खेळताना मित्रांची मस्करी जीवावर बेतली, गुदद्वारात उच्च दाबाच्या पाण्याचा फवारा; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

खैबर पख्तूनख्वामध्येही दहशतवाद्यांचे हल्ले वाढले आहेत. फेब्रुवारीत ३० दहशतवादी हल्ले झाले होते. त्यात ४५ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यात ५८ लोक जखमी झाले होते. दहशतवादी हल्ल्यामागे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान, हाफिज गुल बदादूर ग्रुप, लष्कर-ए-इस्लाम, इस्लामिक स्टेट-खोरासन या दहशतवादी संघटनांचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानी सरकारने केला आहे.

Pakistan
Pakistan Train Hijack: दहशतवाद्यांचा पाकिस्तानला अल्टिमेटम, तासाला ५ जणांना मारणार; आतापर्यंत ३० पाकिस्तानी सैन्यांना मारलं

बलूचिस्तानमध्ये फेब्रुवारीत २३ हल्ले झाले आहेत. त्यात ७५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ४५ जण जखमी झाले आहेत. बलूचिस्तान लिबरेश आर्मी, बलूचिस्तान लिबरेशन फ्रंट, बलूच रिपब्लिकन गार्ड्स सारख्या संघटनांनी २२ हल्ले केले आहेत. त्यात अनेकांचा मृत्यू झाला.. या व्यतिरिक्त टीटीपीने एका हल्ला केला होता. त्यात एकाचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानातील वाढत्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशांतर्गत सुरक्षेंचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बलूचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत. या हल्ल्यामुळे पाकिस्तानसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com