Pakistan Train Hijack: दहशतवाद्यांचा पाकिस्तानला अल्टिमेटम, तासाला ५ जणांना मारणार; आतापर्यंत ३० पाकिस्तानी सैन्यांना मारलं

Pakistan Jafar Express Hijack Update: पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी जाफर ट्रेन हायजॅक केली. तब्बल १४ पाकिस्तानी नागरिकांना ओलिस ठेवण्यात आले आहे. यामधील १०४ जणांची सुटका करण्यात आली आहे. आलिस ठेवलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी पाकिस्तानकडून प्रयत्न सुरू आहेत.
Pakistan Train Hijack:   दहशतवाद्यांचा पाकिस्तानला अल्टिमेटम, तासाला ५ जणांना मारणार; आतापर्यंत ३० जणांचा घेतला जीव
Pakistan Bolan Jafar Express Hijack UpdateSaam Tv News
Published On

पाकिस्तानमध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी ट्रेन हायजॅक केली. या ट्रेनमध्ये ४५० हून अधिक प्रवासी होते. पाकिस्तानच्या बलुचिस्तानाच ही ट्रेन हायजॅक करण्यात आली होती. बलुच लिबरेशन आर्मी या दहशतवादी संघटनेने जाफर एक्स्प्रेस हायजॅक केली होती. या दहशतवादी संघटनेने तब्बल २१४ पाकिस्तानी नागरिकांना ओलिस ठेवले. याप्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. पाकिस्तानी सैनिकांनी आतापर्यंत १०४ बंधकांची सुटका केली. तर अजूनही २१४ प्रवाशांना ओलिस ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे, बलुचिस्तान लिब्रेशन आर्मीने ३० पाकिस्तानी सैन्यांना मारल्याचा दावा केला आहे.

३० पाकिस्तानी सैन्य ठार -

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी नैऋत्य पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी जाफर एक्स्प्रेसला लक्ष्य करत गोळीबार केला. या गोळीबारात ट्रेन चालक गंभीर जखमी झाला. यानंतर दहशतवाद्यांनी ट्रेन हायजॅक केली. ३० पाकिस्तानी सैन्यांना ठार केल्याचा दावा दहशतवादी संघटनेने केले आहे. या हल्ल्याबाबत, बलुचिस्तान प्रांताच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या बीएलएने म्हटले आहे की, त्यांनी ३० सैनिकांना ठार मारले आहे आणि एक ड्रोन पाडला आहे. सुरक्षा दलांनी परिसर रिकामा न केल्यास प्रवाशांना ठार मारण्याची धमकी या दहशतवादी संघटनेने दिली आहे.

Pakistan Train Hijack:   दहशतवाद्यांचा पाकिस्तानला अल्टिमेटम, तासाला ५ जणांना मारणार; आतापर्यंत ३० जणांचा घेतला जीव
Pakistan Railway Hijack : मोठी बातमी; पाकिस्तानात अख्खी ट्रेन हायजॅक, सहा सैनिकांचा मृत्यू; अधिकाऱ्यांसह १०० जणांना ठेवलं ओलीस

बलुच लिबरेशन आर्मीकडून ट्रेन हायजॅक -

पाकिस्तान लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जाफर एक्स्प्रेस क्वेट्टाहून खैबर पख्तूनख्वा येथील पेशावरला जात असताना तिच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात २० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. बलुच लिबरेशन आर्मी या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनेने सुरक्षा दलांसह शेकडो लोकांना ट्रेनमध्ये ओलीस ठेवलेय. हायजॅकच्या या घटनेनंतर घटनास्थळी पाकिस्तानकडून सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे आणि तपास सुरू आहे.

Pakistan Train Hijack:   दहशतवाद्यांचा पाकिस्तानला अल्टिमेटम, तासाला ५ जणांना मारणार; आतापर्यंत ३० जणांचा घेतला जीव
Pakistan Pakhtunkhwa Terrorists Attack: रमजानचा उपवास सोडत असताना दहशतवादी हल्ला; १२ ठार, ३० जण जखमी| Video Viral

बोगद्यात ट्रेनचे हायजॅक -

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने प्रवाशांनी भरलेली जाफर एक्स्प्रेस ट्रेन हायजॅक केली. १८ तासांहून अधिक काळ लोटल्यानंतरही पाकिस्तानी सैन्याला बीएलएच्या तावडीतून ट्रेनमधील प्रवाशांना सोडवण्यात यश आले नाही. पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, क्वेट्टाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये ४०० हून अधिक प्रवासी होते. बलुचिस्तान प्रदेशातील एका बोगद्यात ट्रेनने प्रवेश करतात बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने त्यावर हल्ला केला आणि ट्रेनचा ताबा घेतला. अजूनही २१४ प्रवाशांना या दहशतवाद्यांनी ओलिस ठेवले आहे.

Pakistan Train Hijack:   दहशतवाद्यांचा पाकिस्तानला अल्टिमेटम, तासाला ५ जणांना मारणार; आतापर्यंत ३० जणांचा घेतला जीव
Jaffar Express Hijack : बोगद्यातून बाहेर पडताच रुळांवर स्फोट, पाकिस्तानातील जाफर एक्स्प्रेस कशी हायजॅक झाली?

१०४ जणांची सुटका -

ट्रेन हायजॅक केल्यानंतर दहशतवाद्यांनी ओलिस ठेवलेल्या प्रवाशांची सुटका करण्यासाठी पाकिस्तान आर्मीने ऑपरेशन सुरू केले. पाकिस्तानी सैन्यांनी आतापर्यंत १०४ प्रवाशांची सुटका केली आहे. सुटका करण्यात आलेल्या प्रवाशांमध्ये ५८ पुरूष, ३१ महिला आणि १५ मुलांचा समावेश आहे. १७ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाकिस्तानने दावा कला आहे की, १६ बीएलए दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.

दर तासाला ५ जणांना मारण्याचा इशारा -

बलुच लिबरेशन आर्मीने ओलिसांच्या बदल्यात बलुचच्या राजकीय कैद्यांच्या सुटकेची मागणी केली आहे. यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर अल्टिमेटमची वेळ संपल्यानंतर दर तासाला ५ ओलिसांना मारले जाईल आणि ही प्रक्रिया शेवटपर्यंत सुरू राहील, असे या दहशतवादी संघटनेने सांगितले आहे. सध्या या गटाच्या ताब्यात २१४ ओलिस आहेत.

Pakistan Train Hijack:   दहशतवाद्यांचा पाकिस्तानला अल्टिमेटम, तासाला ५ जणांना मारणार; आतापर्यंत ३० जणांचा घेतला जीव
Pakistan: इज्जत घालवली राव! चॅम्पियन्स ट्रॉफीत असं कधीच घडलं नव्हतं; पाकिस्तानच्या नावे लज्जास्पद रेकॉर्डची नोंद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com