Pakistan: पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! रिझवान अन् बाबर आझमची संघातून हकालपट्टी; या युवा खेळाडूकडे सोपवली जबाबदारी

Mohammad Rizwan Removed As Captain: पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मोहम्मद रिझवान आणि बाबर आझमची संघातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Pakistan: पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! रिझवान अन् बाबर आझमची संघातून हकालपट्टी; या युवा खेळाडूकडे सोपवली जबाबदारी
mohammad rizwansaam tv
Published On

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. तब्बल २९ वर्षांनंतर पाकिस्तानला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद भुषवण्याची संधी मिळाली होती. मात्र पाकिस्तानला या संधीचा फायदा घेता आला नाही.

मायदेशात सामने होऊनही पाकिस्तानचा संघ एकही सामना न जिंकता स्पर्धेतून बाहेर पडला. दरम्यान या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान संघात मोठा भूकंप झाला आहे. थेट कर्णधार मोहम्मद रिझवानची कर्णधारपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. यासह बाबर आझमला देखील संघाबाहेर करण्यात आलं आहे.

Pakistan: पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! रिझवान अन् बाबर आझमची संघातून हकालपट्टी; या युवा खेळाडूकडे सोपवली जबाबदारी
IND vs PAK: क्रिकेट फॅन्ससाठी गुड न्यूज! भारत- पाकिस्तान ३ वेळा येणार आमनेसामने; तारीख नोट करुन ठेवा

पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक आकिब जावेदने पत्रकार परिषदेत बोलताना, सलमान अली आगा पाकिस्तानचा पुढील कर्णधार होणार असल्याची माहिती दिली. या निर्णयामुळे सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला आहे. ३१ वर्षीय फलंदाजाकडे संघाची जबाबदारी सोपवल्यानंतर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानला संघाबाहेर करण्यात आलं आहे.

पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं आकिब जावेदने सांगितलं. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून नसीम शाह आणि मोहम्मद हसनैनला देखील ड्रॉप करण्यात आलं आहे.

Pakistan: पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! रिझवान अन् बाबर आझमची संघातून हकालपट्टी; या युवा खेळाडूकडे सोपवली जबाबदारी
Ind Vs Aus: बॉल स्टंपला लागला पण स्मिथ आऊट झालाच नाही; पाहा नेमकं काय घडलं? Video

केव्हा होणार मालिका?

सध्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा थरार सुरु आहे. न्यूझीलंडचा सेमीफायनलचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणा आहे. त्यानंतर ९ मार्चला फायनलचा सामना रंगणार आहे. दरम्यान १६ मार्चपासून दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. ही मालिका २६ मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. टी-२० मालिका झाल्यानंतर दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेचा देखील थरार रंगणार आहे.

न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी असा आहे पाकिस्तानचा संघ:

सलमान अली आगा (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल समद, अबरार अहमद, हॅरिस रऊफ, हसन नवाज, जहांदाद खान, खुशदिल शाह, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अली, मोहम्मद हॅरिस, मुहम्मद इरफान खान, ओमेर बिन यूसुफ, शाहीन शाह आफ्रिदी, सुफयान मुकीम, उस्मान खान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com