बुलढाण्यातील खामगाव तालुक्यात शेलोडी रोडवर पोलिसांचा छापा
तीन महिला, चार पुरुष आणि एक एजंट महिला ताब्यात
पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल
पोलीस तपास सुरू
Buldhana Khamgaon Illegal Prostitution Racket Police Bust काही दिवसांपूर्वी पुण्यात पोलिसांनी कारवाई करत अवैद्यरित्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना ताब्यात घेतले होते. ही घटना ताजी असतानाच पुण्यानंतर आता बुलढाण्यात देखील पोलिसांनी धाड टाकत अवैद्यरित्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन महिला, चार पुरुष आणि एक एजंट महिलेला ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरु आहे.
बुलढाण्यात खामगाव तालुक्यातील ग्रामीण पोलिसांना कुंटणखाना चालवला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून शेलोडी रोडवरील एका घरात संशयास्पद हालचाली सुरू होत्या. या माहितीद्वारे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने आयपीएस आदित्यकुमार सिंग यांच्या पथकाने शेलोडी रोड परिसरात सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर छापा टाकला.
या कारवाईत तीन महिला, चार पुरुष आणि एक एजंट महिला ताब्यात घेण्यात आली असून त्यांच्यावर पिटा ऍक्ट नुसार कारवाई करण्याची प्रक्रिया सूरु आहे. शेलोडी रोड परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे परिसरातील शांतता भंग पावत होती आणि ग्रामस्थ अत्यंत त्रस्त झाले होते. वारंवार तक्रारी करूनही हा व्यवसाय सुरूच असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते. मात्र पोलिसांच्या कारवाईमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.