ASHOK SONUNE CASE IN BULDHANA
ASHOK SONUNE CASE IN BULDHANASaam tv news

Buldhana: क्रूरतेची परिसीमा! शेतीच्या वादातून ६० वर्षीय व्यक्तीची हत्या, मृतदेह छिन्नविछन्न अवस्थेत आढळला

Buldhana Horror Ashok Sonune: बुलढाण्यात अशोक सोनूने यांचा डोकं, दोन्ही हात आणि गुप्तांग कापलेला मृतदेह आढळला. कुटुंबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत न्यायाची मागणी केली आहे. आरोपी अजूनही मोकाट.
Published on

संजय जाधव, साम टीव्ही

राज्यात गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दोन महिन्यांपूर्वी लोणार तालुक्यातील वढव येथे अपहरण करून अशोक सोनूने यांची हत्या करण्यात आली होती. लोणार पोलीस स्टेशनला जात असल्याचं सांगत ११ मे रोजी ते घरातून निघाले. मात्र, पुन्हा घरात परतले नाही. दरम्यान, ११ जून रोजी सोनूने यांचं मुंडकं आणि हात नसलेला कुजलेला मृतदेह सापडला. या घटनेला महिना उलटला तरी पोलिसांकडून योग्यी ती कारवाई केली जात नाही. यामुळे त्यांच्या मुलाने संताप व्यक्त करत खळबळजनक आरोप केले आहेत.

नेमकं घडलं काय?

लोणार तालुक्यातील वढव या गावचे अशोक सोनूने (वय वर्ष ६०) हे ११ मे रोजी पोलीस ठाण्यात जात असल्याचं सांगत घराबाहेर पडले. नंतर घरात परतलेच नाही. त्यानंतर त्यांच्या पत्नीने अशोक हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. काही दिवसानंतर सोनूने यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली. शेतीच्या वादातून ही हत्या झाली असून, आरोपी अशोक यांच्या भावकीतीलच असल्याचं निष्पन्न झालं आहे.

ASHOK SONUNE CASE IN BULDHANA
Businessman: गाडीतून उतरताच धाडधाड फायरिंग, भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या; मुलालाही असंच संपवलं होतं

मात्र, या प्रकरणात पोलिसांकडून योग्य तपास केला जात नसून, पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप नेते दीपक केदार यांनी केली होती. मात्र, दीपक केदार यांनी केलेल्या आरोपांचं खंडण पोलिसांनी केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने तपास करीत २ आरोपींना अटक केली आहे.सध्या एक आरोपी फरार असल्याची माहिती आहे. तर, मृत व्यक्ती कधीही सरपंच राहिलेले नाहीत, किंवा माजी सरपंचही नव्हते, अशी माहिती समोर आली आहे.

ASHOK SONUNE CASE IN BULDHANA
Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रवादीच्या आमदारानं डिवचलं

सोनूने यांचा प्रायव्हेट पार्टही कापला

शेतीच्या जुन्या वादातून हा हत्याकांड घडला असावा, असा अंदाज आहे. मृत अशोक यांच्या जीवाला धोका असल्याबाबत लोणार पोलिसांना माहिती देण्यात आली होती. त्यानंतर हत्याकांड घडला. अद्याप पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आले नसल्यानं सोनूने यांच्या कुटुबियांनी पोलिसांच्या शोधकाऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. आरोपी मोकाट असल्याकारणाने मृत कुटुंबाच्या जीवाला धोका आहे.

आरोपीने अगदी क्रृर पद्धतीने अशोक सोनूने यांची हत्या केली होती. आरोपीने सोनूने यांचं मुंडके कापलं, नंतर दोन्ही हात कापले तसेच प्रायव्हेट पार्टही कापला, असा गंभीर आरोप मृत अशोक यांच्या मुलाने केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com