Crime News: आईला भेटायला गेलेल्‍या मुलीला समजली धक्‍कादायक बाब; महिलेची दगडाने ठेचून हत्या

आईला भेटायला गेलेल्‍या मुलीला समजली धक्‍कादायक बाब; महिलेची दगडाने ठेचून हत्या
Crime News
Crime NewsSaam tv
Published On: 

बुलढाणा : चिखली तालुक्यातील पिंपळगाव सराई सैलानी परिसरातील भडगाव जंगलामध्ये एका ४५ वर्षीय महिलेची दगडाने ठेचून हत्या (Crime News) करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी रायपूर (Police) पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

Crime News
Gram Panchayat Election: निवडून येण्यासाठी अंधश्रद्धेला खतपाणी; उमेदवारांकडून जादुटोणा-भानामतीचा आधार

लता मुरलीधर कोतकर असे मृत महिलेचे नाव आहे. विकास मुरलीधर कोतकर (वय २७, रा. सुलतानपूर, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद) यांनी प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यांची आई लता कोतकर दहा वर्षांपासून पायाचा त्रास असल्याने सैलानी येथे नेहमी दर्शना करिता येवून काही दिवस तेथेच राहत होत्या.

मुलगी सैलानीला गेल्‍यावर समजले

१४ डिसेंबरच्या रात्री फिर्यादीची बहिण सपना खिल्लारे हिने फोन करून सांगितले, की ती आईला भेटण्यासाठी दोन दिवसांपूर्वी सैलानी येथे गेली होती. परंतु आईसोबत भेट झाली नाही. या दरम्‍यान सपना सैलानी येथे असताना तिला नागरिकांनी भडगाव शिवाराच्या जंगलामध्ये तिच्या आईचे प्रेत पडलेले असल्‍याचे सांगितले. तिने जाऊन पाहिले असता चेहरा व डोके पूर्णपणे दगडाने ठेचलेले होते. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रायपूर पोलिस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.