Gram Panchayat Election: निवडून येण्यासाठी अंधश्रद्धेला खतपाणी; उमेदवारांकडून जादुटोणा-भानामतीचा आधार

निवडून येण्यासाठी अंधश्रद्धेला खतपाणी; उमेदवारांकडून जादुटोणा-भानामतीचा आधार
Gram Panchayat Election
Gram Panchayat ElectionSaam tv

सांगली : ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे. यात विजय मिळविण्यासाठी उमेदवारांचे प्रयत्‍न सुरू आहेत. त्यातच विरोधकांवर भानामती करण्याचा प्रकारही घडत आहे. सांगली (Sangli) जिल्ह्यातील खानापूर आणि वाळवा तालुक्यात हे प्रकार आढळून आले आहेत. उमेदवार निवडून येण्यासाठी आता जादुटोणा-भानामतीचा आधार घेवू लागले आहेत. (Tajya Batmya)

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election: तीस वर्षानंतर होतेय मतदान; केंद्रीय मंत्री दानवेंच्या गावात बूथ कॅप्चर होण्याच्‍या शक्यतेने एसआरपी तुकडीची मागणी

सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकीसाठ (Election News) जिल्ह्यातील 10 तालुक्यामधील 447 ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat) निवडणूक होत आहेत. या निवडणुकीत मतदार अनेक शक्कल लढवत आहेत. उमेदवार निवडून येण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रचार करत आहेत. तर जिल्ह्यात भानमतीचा प्रकार ही समोर आला आहे. जिल्ह्यात अनेकवेळा असे प्रकार घडत आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील तीन तालुक्यात असा भानमतीचा प्रकार समोर आला आहे.

चौकाचौकात ठेवले बाहुल्‍या, लिंबू

वाळवा तालुक्यातील वारणाकाठी असलेल्या कनेगावात ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येण्यासाठी आता अंधश्रद्धेचा आधार घेतला जात आहे. कोणीतरी दुरडीत केळी, कापडपीस, बाहुल्या, लिंबू, हळदी- कुंकू टाकून हे साहित्य कणेगावच्या चौकाचौकात मंगळवारी व बुधवारी मध्यरात्री ठेवले होते. वाळवा तालुक्यातील कनेगाव येथील मारूती चौक, हायस्कूल चौक, भरतवाडी रोड, नवीन गावठाण वसाहत अशा प्रत्येक ठिकाणी अशा भानामतीच्या दुरड्या लोकांचे लक्ष वेधत आहेत.

बॅनरसमोर हळदी– कुंकू, लिंबू

तसेच खानापूर तालुक्यातील जाधवनगर येथे ही भानामतीचा प्रकार समोर आला आहे. प्रचाराच्या बॅनर समोर नारळ, हळदी कुंकू, लिंबू आढळून आले आहे. या घटनेने परिसरात विविध चर्चा रंगू लागली आहे. तर जत तालुक्यातील काशिलिंगवाडी येथील जिल्हास्तरीय आदर्श गाव पुरस्काराने सन्मानित या गावच्या ग्रा.पं. निवडणूकीत काळ्या जादूचा प्रयोगही सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com