Buldhana Crime
Buldhana CrimeSaam tv

Buldhana Crime : वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बंधून ठेवत लांबवीले दागिने

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यात येत असलेल्या वारी हनुमान मंदिरात हा धाडसी दरोडा टाकण्यात आला सातपुड्याच्या पायथ्याशी हे पुरातन हनुमानाचे मंदिर असून याठिकाणी अनेक राज्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात
Published on

बुलढाणा : चोरटयांनी आपला मोर्चा आता मंदिरांकडे वळविला आहे. मोठ्या मंदिरांमध्ये चोरी झाल्याच्या घटना मागील काही दिवसात समोर आल्या आहेत. यातच सातपुड्याच्या पायथ्याशी व मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या समर्थ रामदास स्वामी स्थापित वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. 

बुलढाणा जिल्ह्यात येत असलेल्या वारी हनुमान मंदिरात हा धाडसी दरोडा टाकण्यात आला आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी हे पुरातन जागृत असे हनुमानाचे मंदिर असून याठिकाणी अनेक राज्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात. जागृत मंदिर असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्याने मंदिरातील दानपेटीत दान टाकत असतात. तर काहीजण हनुमानावर आभूषण चढवत असतात.  

Buldhana Crime
Bike Theft : बनावट पेपर्स तयार करुन चोरीच्या दुचाकी विक्री; २० दुचाकी जप्त करत तिघे ताब्यात

दरोडेखोरांनी लांबविले हनुमानाचे दागिने
दरम्यान सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या मंदिरात सायंकाळनंतर भाविकांची फारशी वर्दळ नसते. या ठिकाणी पुजारी असतो. दरम्यान रात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी मंदिरात येत चोरी केली आहे. यावेळी त्यांनी मंदिरातील पुजाऱ्याला बांधून दरोडेखोरांनी हनुमान मूर्तीवरील आभूषणे लुटली. यात जवळपास साडे पाच किलो चांदीचे दागिने व दान पेटीतील एक लाख रुपये घेऊन दरोडेखोर पसार झाले. 

Buldhana Crime
Dhule Crime : मित्राच्या मदतीने पुतण्याने काकाला संपविले; कोंडाईबारी घाटातील 'त्या' मृतदेहाबाबत धक्कादायक माहिती आली समोर

पोलिसांकडून तपास सुरु 
बांधून ठेवलेल्या पुजाऱ्याने कशीतरी आपली सुटका केली. यानंतर घडल्या प्रकाराबाबत परिसरात माहिती दिली. तसेच पोलिसांना देखील याची माहिती दिल्यानंतर सोनाळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेचा पंचनामा करून मंदिरात दरोडा टाकणाऱ्या चोरट्यांचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com