

संजय जाधव, प्रतिनिधी..
Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात डॉक्टर तरुणीला अश्लिल शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बारलिंगा गावामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला असून डॉक्टर तरुणीही अमरावती जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दिल्यावर अंढेरा पोलिसांनी तीन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमरावती (Amravati News) जिल्ह्यातील पीडित तरुणीचे सिंदखेड राजा तालुक्यातील बारलिंगा येथील एका तरुणाशी प्रेमसंबंध आहेत. काही दिवसांपासून प्रियकर फोन उचलत नसल्याने संबंधित तरुणी जाब विचारण्यासाठी प्रियकराच्या घरी गेली होती.
यावेळी प्रियकराच्या घरच्यांकडून तरुणीलााच जबर मारहाण करण्यात आली. तसेच तिचा विनयभंगही केला. यावेळी घटनास्थळावर असलेल्या काही सुज्ञ नागरिकांनी घाबरलेल्या तरुणीलाअंढेरा पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचवले.
या प्रकरणी संबंधित तरुणीने अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तरुणीच्या तक्रारीनुसार आरोपी गणेश जायभाये, लता जायभये, बद्रिनाथ जायभाये यांचा या प्रकरणात समावेश असून त्यांच्यावर मारहाण आणि विनय भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.