Sindkhed Raja Crime News: माहिती अधिकारातून ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार उघड केला, चोरपांग्रातील कुटुंबावर ७०-८० जणांचा प्राणघातक हल्ला

Sindkhed Raja Crime News: बुलढाण्यातील चोरपांग्रा गावातील ॲड.योगेश जायभाये यांच्या घरात घुसून कुटुंबातील सदस्यांवर प्राण घातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे.
pune crime news
pune crime news saam tv

Sindkhed Raja Crime News: बुलढाण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुलढाण्यातील चोरपांग्रा गावातील ॲड.योगेश जायभाये यांच्या घरात घुसून कुटुंबातील सदस्यांवर प्राण घातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत ॲड.योगेश जायभाये यांची पत्नी व वडील गंभीर जखमी आहे. ७० ते ८० जणांनी एकाच वेळी घरावर हल्ला केला आहे. बुलढाण्यातील बीबी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेमुळे जायभाये कुटुंब भयभीत झालं आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, माहिती अधिकारातून ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार उघड करत असल्याचा रागातून हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत जखमी झालेले ॲड.योगेश जायभाये व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर छत्रपती संभाजी नगर येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

pune crime news
Madhya Pradesh Crime News: निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती; १० वर्षांच्या चिमुकलीवर क्रूरतेने सामूहिक अत्याचार, घटनेनं मध्य प्रदेश हादरलं

नेमकं काय घडलं?

मिळालेलया माहितीनुसार, ॲड.योगेश जायभाये हे तारीख २६ जुलै रोजी घरात बसले होते. त्यावेळी गावातील १४ जणांनी ७० ते ८० लोक गैरकायद्याची लोक जमवली. त्यानंतर ॲड.योगेश जायभाये यांच्या घरात बेकायदेशीर प्रवेश केला. त्यानंतर ग्रामपंचायत कारभाराबाबत आणि पंतप्रधान आवास योजनेच्या बाबतीत तक्रारी का करतो, असा प्रश्न या लोकांनी केला. त्यानंतर या लोकांनी ॲड.योगेश जायभाये यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने अचानक लोखंडी रॉडने व काठ्यानी अचानक मारहाण करत प्राणघातक हल्ला केला.

या लोकांनी ॲड.योगेश जायभाये यांचे वडील विठोबा जायभाये यांच्यावरही लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात विठोबा जायभाये यांचा डावा हात फॅक्चर झाला. तसेच ॲड.योगेश जायभाये यांच्या पत्नीचा मोबाईल फोन हिसकावून घेतला. या लोकांनी घराच्या खिडक्याच्या फाचा फोडून नुकसान केले.

pune crime news
Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत 'स्पेशल २६' चा थरार; 6 जण वाऱ्यासारखे आले अन् तत्कालीन अधिकाऱ्याचं घर साफ करून गेले

दरम्यान, आरोपींनी या पुढे ग्रामपंचायतच्या कामाबाबत बोलला, बंदुकीच्या गोळ्या घालून ठार मारु अशी धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर जायभाये कुटुंबातील सदस्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या मारहाणप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सदानंद सोनकांबळे हे करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com