Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत 'स्पेशल २६' चा थरार; 6 जण वाऱ्यासारखे आले अन् तत्कालीन अधिकाऱ्याचं घर साफ करून गेले

Navi Mumbai Loot Case : नवी मुंबईत चक्रावणारी घटना घडली आहे. बॉलिवूड चित्रपट स्पेशल २६ स्टाइलने लूट केल्याचे उघडकीस आले आहे.
Navi Mumbai Airoli Crime News
Navi Mumbai Airoli Crime News SAAM TV
Published On

Navi Mumbai Loot Case : नवी मुंबईत चक्रावणारी घटना घडली आहे. बॉलिवूड चित्रपट स्पेशल २६ स्टाइलने लूट केल्याचे उघडकीस आले आहे. सहा चोरांच्या एका टोळीनं सरकारच्या बांधकाम विभागात काम केलेल्या अधिकाऱ्याचं घर 'साफ' केलं. बोगस पोलीस सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या ऐरोलीतील घरात घुसले आणि जवळपास ३६ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल लुटून पोबारा केला. (Latest Marathi News)

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ऐरोलीतील ही घटना बॉलिवूड चित्रपट स्पेशल २६ च्या कथानकासारखीच आहे. चित्रपटात अक्षय कुमार आणि त्याच्यासोबतची टोळी तोतया सीबीआय अधिकारी बनून अनेकांच्या घरावर छापेमारी करतात आणि त्यांच्याकडील पैसे आणि किंमती वस्तू घेऊन पोबारा करतात. नवी मुंबईतल्या ऐरोलीतही या चित्रपटाच्या कथानकासारखीच घटना घडलीय. सहा जणांच्या टोळीनं एसीबीचे अधिकारी असल्याचा बनाव केला आणि बांधकाम खात्यातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घराची झडती घेतली.

Navi Mumbai Airoli Crime News
Madhya Pradesh Crime News: निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती; १० वर्षांच्या चिमुकलीवर क्रूरतेने सामूहिक अत्याचार, घटनेनं मध्य प्रदेश हादरलं

सेवानिवृत्त अधिकारी कांतिलाल यादव यांच्या तक्रारीनुसार, २१ जुलै रोजी दुपारी सहा जण त्यांच्या घरात घुसले. टोळीचा म्होरक्या दाढीवाला होता. आम्ही एसीबीचे अधिकारी असल्याची बतावणी त्याने केली. तुमच्याविरोधात तक्रार आली आहे. तुमच्या घराची झडती घेण्यासाठी आलोय, असं यादव यांना सांगितलं.

त्यानंतर त्या तोतया अधिकाऱ्याने यादव आणि त्यांच्या पत्नीचा मोबाइल जप्त केला. त्यांच्या घराची झाडाझडती होईपर्यंत त्या दोघांनाही जवळच बसून ठेवले. कांतिलाल यांच्या पत्नीला कपाटाच्या चाव्या देण्यास सांगितले. (Crime News In Marathi)

Navi Mumbai Airoli Crime News
Tamil Nadu News : कृष्णागिरीत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ३ महिलांसह ८ मृत्युमुखी

यादव यांनी तोतया अधिकाऱ्याकडे ओळखपत्र दाखवण्याचा आग्रह धरला. मात्र, त्याने नकार दिला. झडती झाल्यानंतर सर्व ओळखपत्रे आणि संबंधित कागदपत्रे दाखवू असे त्याने सांगितले. यादव दाम्पत्याला त्याच्याजवळच जबरदस्ती बसून ठेवले. तर त्याच्या इतर पाच साथीदारांनी घरातील कपाट उघडून झडती घेतली. त्यातील २५.२५ लाख रुपये, ३.८० लाखांची सोन्याची चेन, एक अंगठी, बांगड्या असे एकूण ४.२० लाखांचे दागिने, ४० हजारांची हिऱ्याची अंगठी, ८० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र आणि किमान १० हजार रुपये किंमतीची घड्याळे घेतली. हा सर्व मुद्देमाल एका बॅगमध्ये भरून सर्व जण फरार झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com