संजय जाधव, बुलढाणा|ता. २३ मे २०२४
एकीकडे खरीपाचा हंगाम सुरु होणार आहे. शेतीच्या मशागतीच्या कामांची लगबग सुरू आहे. अशातच जुन्या कर्जाच्या थकबाकीमुळे नवे पिक कर्ज मिळणार नाही या चिंतेने एका 73 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना बुलढाण्यात घडली. बुलढाण्यातील खामगाव तालुक्यात घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
खरीप हंगामाची चाहुल लागल्याने बळीराजाकडून शेतीच्या मशागतीच्या कामांची लगबग सुरू आहे. तसेच नवीन बि- बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी गर्दी करत आहेत. अशातच अगोदर काढलेल्या कर्जाची थकबाकी आहे, त्यामुळे शेतीला नवे कर्ज मिळणार नाही, याच चिंतेने बुलढाण्यातील एका ७३ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्याच्या कदमापूर येथे ही घटना घडली. नारायन् मुकाजी गुरव (वय, ७३ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतीवर अगोदरच काढलेल्या पिक कर्जाची थकबाकी आहे, ते कर्ज फेडल्याशिवाय नवीन पिक कर्ज मिळणार नाही या चिंतेने नारायन गुरव यांनी गावातच गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले.
दरम्यान, याबाबत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाने खामगाव पोलिसात तक्रार दिली आहे. या घटनेने बुलढाणा जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. तसेच कर्जाच्या चिंतेतून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने कदमापूर गावावर शोककळा पसरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.