Buldhana Accident Video : हायवेवर सुसाट कारचा ओढला हँडब्रेक; कार थेट हवेत उडाली, अपघातानंतरचा VIDEO बघून उडेल थरकाप

Buldhana Accident News : आज दुपारी खामगाव वरून शेगावकडे येत असताना नवोदय विद्यालयाजवळ कार वेगात असताना चालकाने अचानक हॅन्ड ब्रेक ओढले यामुळे कार अचानक हवेत उडाली आणि रस्त्यालगतच्या शेतात जाऊन धडकली.
Buldhana Accident Video
Buldhana Accident VideoSaam Digital

प्रत्येक गाडीला हँडब्रेक असतो. त्याला पार्किंग ब्रेक आणि आपत्कालीन ब्रेक देखील म्हणतात. कार सुरक्षित ठेवण्यातही ते महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र भरधाव वेगात असलेल्या कारचे हेच हॅन्ड ब्रेक जर आपण ओढले तर काय होऊ शकतं याच प्रत्येय आज खामगाव-शेगाव मार्गावर झालेल्या अपघातातून दिसून आला. आज दुपारी खामगाव वरून शेगावकडे येत असताना नवोदय विद्यालयाजवळ कार वेगात असताना चालकाने अचानक हॅन्ड ब्रेक ओढले यामुळे कार अचानक हवेत उडाली आणि रस्त्यालगतच्या शेतात जाऊन धडकली. या अपघातात कार मधील महिलेसह १ जण जखमी झाली. दोघांना शेगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कारच्या धडकेत आईसह दोन मुले आणि भाच्याचा मृत्यू

जळगाव शहरानजीक रामदेववाडी येथे भीषण अपघातात आज भीषण अपघात झाला. या अपघातात आईसह दोन मुलं व एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राणी सरदार चव्हाण (वय ३०), सोहन चव्हाण (वय ७) व सोमेश सरदार चव्हाण (वय २) अशी अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. राणी चव्हाण यांचा भाचा लक्ष्मण भास्कर राठोड (वय १२) हा अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

Buldhana Accident Video
Ulhasnagar News: उल्हासनगर येथील सेंच्युरी कंपनीत भीषण स्फोट; २ कामगारांचा जागीच मृत्यू, पाच जखमी

धावत्या बसमध्ये प्रवाशाचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यात धावत्या बसमध्येच प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विनंती करून देखील बस रुग्णालयात नेण्यात आली नाही त्यामुळे गावकऱ्यांनी वाहन चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. धावत्या बसमध्ये प्रवाशाला भोवळ येऊन तो बेशुद्ध पडला होता. बस आगारात पोहोचल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

Buldhana Accident Video
Leopard Attack : घराबाहेर उभ्या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; आईच्या डोळ्यादेखत बालिकेचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com