Bride Entry on Bullet: नवरदेवाला बुलेटवर घेऊन नवरीची लग्नमंडपात एट्री! वऱ्हाडी मंडळी पाहतच राहिले

Bride Entered In mandap on Bullet : एका नवरीने नवरदेवाला थेट बुलेटवर बसवून लग्नमंडपात एंट्री घेतल्याचा व्हिडो समोर आला आहे.
Bride Entered for Marriage on Bullet
Bride Entered for Marriage on Bulletsaam tv
Published On

>> रोहिदास गाडगे, साम टीव्ही

Bride Entry on Bullet with groom: आजकाल लग्न हा केवळ आनंदाचा सोहळा राहिलेला नाही तर त्यातही हटके काहीतरी करण्याचा नवरदेव नवरीचा प्रयत्न असतो. मग त्यासाठी कुणी डेस्टिनेशन वेडिंग करतात तर कुणी विवाह सोहळ्याला काहीतरी हटके लूक देतात. तुम्ही लग्नमंडबात नवरी डान्स करत नवऱ्याला घेऊन आलेले व्हिडिओ पाहिले असतील किंवा नवरा स्टेजवर असताना नवरी त्याच्यासाठी गाण म्हणत आणि डान्स करत स्टेकडे येतानाचे व्हिडिओ देखील तुम्ही पाहिले असतील.

असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परंतु आता एका नवरीने नवरदेवाला थेट बुलेटवर बसवून लग्नमंडपात एंट्री घेतल्याचा व्हिडो समोर आला आहे. या व्हिडिओ नवरी पुढे बसून बुलेट चावलताना दिसतेय तर तिच्या मागे नवरदेव बसलेला तुम्ही पाहू शकता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Bride Entered for Marriage on Bullet
Wedding Fight: बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाने केली भलतीच मागणी; सासऱ्याने भर मंडपात चप्पलेने धुतला, VIDEO व्हायरल

या डेरिंगबाज नवरीचा हा व्हिडिओ पुण्याच्या शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील आहे. येथे शितोळे आणि धुमाळ या दोन कुटुंबातील नवरदेव नवरीचा विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला. पण हा विवाह सोहळा चर्चेत आला तो नवरीने लग्नमंडपात घेतलेल्या हटके एंट्रीमुळे. या ठिकाणी लग्नासाठी वरात घेऊन पोहोचलेल्या नवरदेवाला नवरीने थेट बुलेटवर बसून लग्नमंडपात घेऊन गेली. नवरीने नवरदेवाला बुलेटवर मागे बसून लग्नमंडपात घेतलेली ही एंट्री सध्या चर्चेचा विषय बनली आहे. (Viral News)

Bride Entered for Marriage on Bullet
iPhone In Drain Viral Video: चुकून आयफोन गटारात पडला, पठ्ठ्याने काढले कपडे अन्... VIDEO तुफान व्हायरल

नवरीची ही हटके एंट्री या लग्न सोहळ्याचं खास आकर्षण ठरलं. मुलीला सर्व वाहने चालवता येत असल्याने शेतकरी बापाने लेकीची हौस पुर्ण करत तिला लग्नात भेट म्हणून एक कार, एक बुलेट आणि दुचाकी दिली. शेतकरी बापाने आपल्या मुलीच्या लग्नाची हौस पूर्ण केली. मुलगी आणि बापाच्या नात्यातील या प्रेमाचं वऱ्हाडी मंडळींनी तोंडभरून कौतुक केलं. या लग्न सोहळ्याची पंचक्रोशित चांगलीच चर्चा रंगली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com