Manoj Jarange : मोठी बातमी! एकनाथ शिंदें आज परभणी दौऱ्यावर, मनोज जरांगेंनी दिला इशारा

Manoj Jarange Parbhani Eknath Shinde News : मनोज जरांगे पाटील यांनी परभणीतील शिंदेसेनेच्या शेतकरी मेळाव्याला विरोध केला आहे. एकनाथ शिंदेंचा दौरा रद्द करा, अन्यथा मराठा बांधवांसह परभणीत येण्याचा इशारा त्यांनी खासदार संजय जाधवांना दिला.
Manoj Jarange Eknath Shinde Warns Over Parbhani Farmers Rally
Manoj Jarange Eknath Shinde Warns Over Parbhani Farmers RallyAI Image
Published On
Summary
  • मनोज जरांगे पाटलांचा शिंदेसेनेला इशारा

  • परभणीत होणार शेतकरी मेळावा रद्द करण्याची मागणी

  • खासदार संजय जाधव यांना दिला इशारा

  • आंदोलनस्थळी ५० वाहनांचा ताफा दाखल

मराठा बांधवांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. मात्र आता जरांगे यांनी परभणीत आज होणाऱ्या शिंदेसेनेच्या शेतकरी मेळाव्याला कडाडून विरोध केला आहे. तसेच एकनाथ शिंदेंचा परभणी दौरा रद्द करा अन्यथा मी मराठा बांधवांना घेऊन परभणीत येईन असा इशारा शिंदेसेनेचे खासदार संजय जाधव यांना दिला आहे. दरम्यान आता परभणीत आज आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. आता हा मेळावा होणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

उबाठातून बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटात दाखल झालेले खासदार संजय जाधव यांनी आज परभणीत शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या निमित्त एकनाथ शिंदे आज परभणी दौऱ्यावर येणार आहेत. तत्पूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी त्यांच्या दौरा रद्द करण्याचा इशारा दिला आहे. जरांगे यांनी संजय जाधव यांना फोन करून ठणकवून सांगितले की, शेतकरी मेळावा घेताय, त्याला एकनाथ शिंदे येणार आहेत. तो कार्यक्रम घेऊ नका, अन्यथा मी आंदोलनस्थळ सोडून तिथे येईल. सोबतच मराठा बांधवाना घेऊन येईन. पुढे जे काही नुकसान होईल त्याचं खापर तुमच्या अंगावर घ्या. असे स्पष्ट शब्दांत सांगितले.

Manoj Jarange Eknath Shinde Warns Over Parbhani Farmers Rally
Cucumber Benefits : काकडी सोलायची की नाही? ९०% लोक करतात ही चूक; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर सातत्याने आक्रमक भूमिका घेणाऱ्या जरांगे पाटील यांनी यावेळीही शिंदे सरकारवर निशाणा साधला. “संजय शिरसाट मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करत आहेत आणि मराठ्यांच्या जीवावर उड्या मारण्यासाठी कार्यक्रम घेणार का?” असा सवाल त्यांनी केला. जरांगे पाटील यांनी कार्यक्रम रद्द करण्याचा आग्रह धरला असून, “कार्यक्रम रद्द करा, अन्यथा गोंधळ अटळ आहे,” असा इशाराही दिला. तसेच, “संजय शिरसाट यांनी रद्द केलेले प्रमाणपत्र द्या आणि मग एकनाथ शिंदेंना सांगा,” असेही त्यांनी जाधव यांना सुनावले.

Manoj Jarange Eknath Shinde Warns Over Parbhani Farmers Rally
Amla Benefits : केसांपासून ते पचनापर्यंत होतील 'हे' ६ फायदे, आवळ्याचा ज्यूस १५ दिवस रोज पिऊन पाहा

दरम्यान मनोज जरांगे यांनी कार्यकर्त्यांना वाहने तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या असून आंदोलनस्थळी ५० वाहनांचा ताफा सध्या दाखल झाला आहे. तर दुसरीकडे परभणीत गेल्या काही दिवसांपासून या शेतकरी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. मात्र, आता जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यानंतर हा कार्यक्रम पार पडणार की रद्द होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच खासदार संजय जाधव या परिस्थितीत नेमका काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com