SIR Update : SIR प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार; जाणून घ्या A to Z माहिती

Maharashtra SIR Update News : महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे.
maharashtra SIR big update news
maharashtra SIR big update news AI
Published On: 
Summary
  • SIR प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट

  • १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार.

  • दावे आणि हरकतींची मुदत १२ ऑक्टोबर पर्यंत

महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR प्रक्रियेच्या वेळापत्रकात भारत निवडणूक आयोगाने महत्त्वाचा बदल केला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, आता अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबरऐवजी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच, मतदार यादीत नाव नोंदवणे, तपशिलांमध्ये दुरुस्ती करणे आणि दावे व हरकती दाखल करण्यासाठी मतदारांना अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे.

दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत वाढवली

निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार, मतदार पात्रता यादी १ ऑक्टोबर २०२६ ही कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नाव किंवा पत्त्यात बदल करणे तसेच इतर आवश्यक दावे आणि हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबरवरून वाढवून १२ ऑक्टोबर २०२६ करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांना आपल्या नोंदी तपासून आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे.

maharashtra SIR big update news
Monsoon Update : मुसळधार पाऊस झोडपणार! २४ राज्यांना अलर्ट जारी; महाराष्ट्रात कसं असेल हवामान? वाचा

१६ नोव्हेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध होणार

आयोगाच्या निर्देशानुसार, नोटिसा बजावणे तसेच दावे आणि हरकतींची प्रक्रिया ३१ ऑगस्ट ते १० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सुरू राहणार आहे. या प्रक्रियेदरम्यान मतदारांच्या नोंदींची तपासणी आणि आवश्यक पडताळणी केली जाणार आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १६ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

maharashtra SIR big update news
Tea Leaves : चहा पिऊन चोथा कुंडीतल्या झाडांना घाला; ८ दिवसात दिसतील 'हे' 6 चमत्कार

मतदारांनी कोणती काळजी घ्यावी?

SIR प्रक्रियेदरम्यान मतदारांनी मतदार यादीतील आपले नाव, पत्ता आणि इतर वैयक्तिक तपशील काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे. नाव वगळले गेले किंवा नोंदींमध्ये काही चूक आढळली, तर नियमांनुसार संबंधित दावा किंवा हरकत दाखल करता येऊ शकते. त्यामुळे पात्र मतदारांनी अंतिम मुदतीपूर्वी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com