Today Marathi News: भारताची अर्थव्यवस्था बुलेटच्या वेगाने धावणार: जागतिक बँक

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (11 june 2024) : नरेंद्र मोदी यांचे निर्णय , राज्यातील राजकीय घडामोडी, पावसाच्या अपडेट, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर वाचा.
राज्यातील प्रत्येक महत्वपूर्ण घडामोडींचे वेगवान अपडेट वाचा
Today's Marathi News Live Saam tv

Indian Economy: भारताची अर्थव्यवस्था बुलेटच्या वेगाने धावणार: जागतिक बँक

जागतिक बँकेने भारतीय अर्थव्यवस्थेचा सर्वात वेगवान विकास होण्याचा अंदाज वर्तवला आहे. जागतिक बँकेने मंगळवारी आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारतासाठी 6.6% सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा अंदाज कायम ठेवला.

Pune Hit and Run Case :कल्याणीनगर आपघाताचे पोलिसांकडून 'क्रॅश इम्पॅक्ट असेसमेंट'

कल्याणी नगर अपघात प्रकरणी मोठी अपडेट

अपघात प्रसंगी नेमके काय घडले असावे? दोन गाड्यांची अपघात नेमकी कशी झाली असेल? मृतांना नेमका मार कसा बसला असेल? याचा या विश्लेषणात अभ्यास करण्यात आला

अपघात ग्रस्त वाहने, मृत आणि त्यांच्या अंगावरील जखमा यांचा सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात आला

अपघात नेमका कसा घडला असावा याविषयी तंतोतंत अंदाज बांधण्यास पोलिसांना मोठी मदत

"क्रॅश इम्पॅक्ट असेसमेंट" मध्ये अपघाताविषयी अत्यंत महत्वपूर्ण अहवाल पोलिसांच्या ताब्यात

संसदेचं विशेष अधिवेशन 24 जून ते 3 जुलै दरम्यान, सूत्रांची माहिती

24 जून ते 3 जुलै या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन होण्याची शक्यता

या अधिवेशन काळात खासदारांचा शपथविधी, लोकसभा अध्यक्षांची निवड आणि राष्ट्रपतींचे अभिभाषण होईल

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव याचाही अधिवेशनात समावेश

सूत्रांची माहिती

मुंबई -गोवा महामार्गावर कंटेनरचा अपघात, मोठी दुर्घटना टळली 

रत्नागिरी - मुंबई -- गोवा महामार्गावर कंटेनरचा अपघात

खेडच्या जगबुडी नदीत जाता जाता कंटेनर वाचला

जगबुडी नदीवरील भरणे पुलावरील अपघात

गोव्याच्या दिशेने हा भरलेला कंटनेर जात होता

दुर्घटना होता होता टळली सुदैवाने यात कुणीही जखमी नाही

विधानपरिषद निवडणुकीबाबत‌ चर्चेतून मार्ग निघेल, नाना पटोले

उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क झालाय

त्यांच्याशी चर्चा केलीय

चर्चेतून विधानपरिषद निवडणुकीबाबत‌ मार्ग निघेल

निश्चितच आगामी काळात महाविकास आघाडीचं सरकार येईल

मुख्यमंत्र्यांनी घेतला पाण्याचा उपलब्ध साठा, पावसाचा आढावा

राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून राज्यात दि. १ ते ११ जून पर्यंत संपुर्ण जून महिन्याच्या सरासरीच्या ३६ टक्के पाऊस झाला आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन करावे. शेतकऱ्यांना बियाणे, खतांची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्या भागात टंचाईची स्थिती आहे तेथे टॅंकरद्वारे पाणी पुरवठा आणि चारा छावण्यांसाठी जिल्हा प्रशासनाने प्राधान्य द्यावे. आपत्तीकाळात सर्व विभागांनी समन्वयातून काम करून नागरिकांना वेळेवर मदत पोहोचेल यादृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

निवडणूक जिंकल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच रायबरेलीच्या दौऱ्यावर

खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी रायबरेलीमध्ये पोहोचले

निवडणूक जिंकल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच रायबरेलीला

राहुल गांधी यांचा हा आभार दौरा

राहुल गांधी हे अमेठी आणि रायबरेलीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार

रायबरेली आणि वायनाड या 2 लोकसभा मतदार संघातून राहुल गांधी निवडून आले असल्याने ते एका जागेच्या राजीनाम्याची आज घोषणा करण्याची शक्यता

शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही खासदार फुटीची भीती?

बीडचे शरद पवार गटाचे खासदार अजित पवार यांच्या गळाला?

बीडचे बजरंग सोनवणे यांचा अजित पवार यांना फोन.

फोन वर १० मिनिट चर्चा झाल्याची माहिती..

आणखी खासदार संपर्कात असल्याण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली

राज्यातील पाण्याच्या सद्यस्थितीवर सह्याद्री अतिथीगृहावर विशेष बैठक

राज्यातील पाण्याच्या उपलब्धतेबाबत सद्यस्थिती व पर्जन्यमानाबाबत आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, कृषी मंत्री धनंजय मुंडे, एमएसआरडीसी मंत्री दादाजी भुसे, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव नितीन करीर तसेच राज्य प्रशासनातील सर्व विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, प्रशासकीय अधिकारी हेदेखील उपस्थित होते.

Lok Sabha Election : निवडून आलेले राज्यसभेचे १० खासदार लोकसभेतचं राहणार 

राज्यसभेत असलेल्या पण आता लोकसभेला निवडून आलेल्या 10 खासदारांनी लोकसभेत राहायचा कळवला निर्णय

राज्यसभा सचिवालयाने जारी केली माहिती

महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि पियूष गोयल यांचा समावेश

लवकरच राज्यसभेच्या या 10 रिक्त जागांसाठी होणार निवडणूक

खेड तालुक्यातील आस्तान-धनगरवाडी रस्त्यावर दरड कोसळली, वाहतूक ठप्प

रत्नागिरी - खेड तालुक्यातील आस्तान धनगरवाडी येथील रस्त्यावर दरड कोसळली आहे.

दरड कोसळल्याने वाहतूक झाली ठप्प आहे.

सततच्या पडणा-या पावसामुळे रस्त्यावर दरड कोसळली

शिक्षक आमदार किशोर दराडेंच्या दादागिरीचा व्हिडीओ वायरल

अपक्ष किशोर दराडे यांना धक्काबुक्की केल्याचाही दराडे यांचा आरोप

विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यावेळी दराडे यांनी घातला होता गोंधळ

पोलीस अधिकाऱ्यांनाही दादागिरी केल्याचं व्हिडीओ समोर

Maharashtra Politics 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस, शिवसेनेत जुंपली; 

लोकसभा निवडणुका संपताचं महाविकास आघाडीत श्रेय्यवात आणि विधानसभेच्या जागांवरून महाविकास आघाडीत जुंपली आहे. उद्धव ठाकरेंनी आधी दोन जागा जाहीर केल्या आमची कोकण आणि नाशिकमध्ये तयारी आहे असं मी त्यांना सांगितलं. बसून निर्णय करायला हवा होता, मात्र अजून वेळ गेलेली नसल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Union Agriculture Minister :  शिवराज सिंह यांनी स्वीकारला कृषी मंत्रालयाचा कारभार

मध्यप्रदेशचा माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषी खाते देण्यात आले आहे. त्यांनी आज कृषी मंत्रालयाचा कारभार स्वीकारला. कारभार स्वीकारताच त्यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार व्यक्त केलाय.

Parbhani Rain :  पाऊस झाल्याने शेतकरी आनंदीत, खरीपाच्या पेरणीची लगबग

परभणी जिल्हात दोन दिवसापासून पावसाची दमदार हजेरी

शेतात खरीप पूर्व कोळपणी करत खताची पेरणी लगबग सुरु

पावसावर सरकीची लागवड होणार

यावर्षी 5 लाख 63 हजार हेक्टरवर खरीपाच्या पेरणीचं नियोजन

100 मिलीमीटर पाऊस झाल्यावर पेरणी करण्याचे आव्हान कृषी विभागाने केले

lalbaugcha raja cha raja Ganesh Mandal: लालबागच्या राजाचे 'श्री गणेश मुहूर्त पूजन' संपन्न

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे 91 व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन झालं. मंगळवारी सकाळी 6 वाजता मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे आणि मूर्तीकार कांबळी आर्ट्सचे रत्नाकर मधुसुदन कांबळी यांच्या शुभहस्ते मूर्तीकार कांबळी आर्ट्स यांच्या चित्रशाळेत संपन्न झालं. यावेळी खजिनदार मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकांचे पूजन केलं.

Kalyan Dombivli Rain : कल्याण डोंबिवलीत विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात

कल्याण डोंबिवलीत सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं.

कल्याण-डोंबिवलीमध्ये अर्ध्या तासापासून पावसाला सुरुवात

काही मिनिटांपासून पावसाने कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात जोर धरला आहे.

विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे .

पावसामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ

Thane Rain Update : ठाण्यात मुसळधार पाऊस, वंदना सिनेमा परिसरात पाणी साचलं

ठाणे शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. शहरातील वंदना सिनेमा या ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे लोकांना पाण्यातून चालत मार्ग काढावा लागत आहे.

Amit Shah : अमित शहा यांनी सहकार विभागाचा पदभार स्वीकारला

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी सहकार विभागाचा पदभार स्वीकारला. यावेळी राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अमित शाह यांचं स्वागत केलं.

Chandrababu Naidu : चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधी सोहळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रण

चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रण मिळालं आहे.

आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी चंद्राबाबू नायडू शपथ घेणार आहेत.

शपथविधीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सकाळी ९ वा आंध्रप्रदेशला होणाऱ्या शपथविधीसाठी मुंबईहून निघणार आ

Nashik News : नाशिक शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवार किशोर दराडेंची माघार

किशोर दराडे हे अर्ज भरल्यानंतर पोलीस सुरक्षेत कोपरगावकडे रवाना झाले होते. त्या दिवसापासून गायब असल्याने राजकीय अपहरणाची चर्चा होती. माघार घेण्यासाठी अर्जाच्या दिवशी किशोर दराडे यांना धक्काबुक्की झाली होती.

Kolhapur News : कोल्हापुरात जोरदार वाऱ्यामुळे रस्त्यावर झाड कोसळलं, वाहतूक पूर्ण बंद

कोल्हापुरात जोरदार वाऱ्यामुळे भलंमोठं सागवानाचे झाड रस्त्यावर कोसळलं. कोल्हापूर-हुपरी मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. पट्टणकोडोली गावाजवळ झाड कोसळल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. झाड पडल्याने महावितरणचे खांब कोसळून तारा देखील तुटल्या आहेत. घटनास्थळी महावितरणचे अधिकारी आणि पोलीस दाखल झाले आहेत.

Neet Exam : नीट परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे महत्वाचे आदेश

नीट परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे आदेश दिले आहेत. नीट संदर्भात पुढील सुनावणी ८ जुलैला होणार आहे. सुप्रीम कोर्टाने एनटीएला नोटीस पाठवली आहे. त्यामुळे एनटीएला उत्तर द्यावे लागणार आहे.

Nana Patole : नाना पटोले घेणार उद्धव ठाकरेंची भेट

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. मातोश्री निवासस्थानी भेट घेणार आहेत. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट होणार आहे. कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि पदवीधर या ठिकाणांच्या जागांवर चर्चा करणार आहेत.

Ahmednagar Rain : नगरमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत

नगर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच आहे. सकाळपासून ठिकठिकाणी पावसाची हजेरी सुरु आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Latur Rain :  लातूरमध्ये पावसाचा कहर; पुलाशेजारील पर्यायी रस्ता वाहून गेला

लातूर-उदगीर महामार्गावरच्या नळेगाव येथील नवीन पुलाशेजारील पर्यायी रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला

लातूर उदगीर वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे

पहिल्याच पावसात जिल्ह्यातील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाली आहे.

BJP President : भाजपचा नवीन अध्यक्ष आरएसएसच्या मुख्यालयातून ठरवला जाणार?

भाजपाचा नवीन अध्यक्ष नागपूर आरएसएस च्या मुख्यालयातून ठरवला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या अध्यक्षपदासाठी ओम माथुर आणि सुनील बन्सल यांच्या नावाची चर्चा आहे. जेपी नड्डा यांचा कार्यकाळ या महिन्यात संपत आहे. जेपी नड्डा यांची वर्णी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात झाल्यामुळे नवीन अध्यक्ष लवकरच निवड केला जाणार असल्याची माहिती आहे. भाजप अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेले शिवराज सिंह चौहान, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.

Pune News : पुणे महापालिकेच्या उपायुक्तांना आता 'नाईट ड्युटी'

पुणे महापालिकेच्या उपायुक्तांना आता 'नाईट ड्युटी' करावी लागणार आहे.

आपत्ती व्यवस्थापन कक्षात रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त केला जाणार आहे.

संपूर्ण शहरावर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातून नजर ठेवली जाणार आहे.

Ghatkopar Accident : घाटकोपरमध्ये भरधाव कार दुभाजकला धडकली, तीन प्रवासी किरकोळ जखमी

घाटकोपरमध्ये पूर्व द्रुतगती मार्गावर उड्डाण पुलाखाली भरधाव कारने दुभाजकाला धडक दिली. या धडकेत गाडी उलटली. या अपघातात ३ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

Maharashtra Politics : विधानसभेत राज्यात एनडीएचं सरकार येणार नाही; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी शिंदे गटाविरोधात ट्विट करत डिवचलं आहे. तसेच प्रफुल पटेल यांनाही मंत्रिपदावरून टोला लगावला आहे. विधानसभेत महाराष्ट्रात एनडीएचं सरकार येणार नसल्याचेही दावा जयराम रमेश यांनी केला आहे.

Nashik News : नाशिकवर पाणी कपातीचं संकट; गंगापूर धरणात १८ टक्के पाणीसाठा

नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अवघे १८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर जिल्ह्यातील लहान मोठ्या २४ धरणांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे नाशिकमध्ये पावसाने हजेरी न लावल्यास पाणी कपातीचं संकट निर्माण होऊ शकतं.

Amaravati News : शेतातील विहिरीत १२ निलगायी पडल्या, सात निलगायींचा मृत्यू

अमरावतीच्या पार्वती नगरात असलेले एका विहिरीत विहिरीला सुरक्षा भिंत नसल्याने 12 नीलगायी विहिरीत पडल्या

या घटनेत 7 नीलगायींचा मृत्यू

वन विभाग व महापालिकेच्या पथकाला अथक परिश्रमानंतर 5 नीलगायीला विहिरीच्या बाहेर सुखरूप काढण्यात यश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com