मोठी बातमी! पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालला न्यायालयाचा दिलासा

BrahMos Engineer Pakistan Spying: ब्रह्मोस अभियंता निशांत अग्रवालला न्यायालयाने दिलासा दिलाय. आयटी कायद्यांतर्गत निर्दोष मुक्तता करण्यात आली, पण अधिकृत गुपिते कायद्यांतर्गत हेरगिरीसाठी त्याला दोषी ठरवण्यात आले आहे.
BrahMos Engineer Pakistan Spying:
BrahMos engineer Nishant Agrawal gets partial relief from court; acquitted under IT Act but convicted for espionage under the Official Secrets Act.saam tv
Published On
Summary
  • ब्राह्मोस एअरोस्पेस कंपनीचा अभियंता निशांत प्रदीपकुमार अग्रवालला न्यायालयाचा दिलासा

  • न्यायालयाने शिक्षा रद्द करत तीन वर्षांची ठोठावली शिक्षा

  • ब्रह्मोस एअरोस्पेस कंपनीच्या नागपुरातील प्रकल्पामध्ये सिस्टम इंजिनिअर पदावर कार्यरत होता

पराग ढोबळे, साम प्रतिनिधी

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा अभियंता निशांत प्रदीपकुमार अग्रवाल याला नागपूर खंडपीठाचा दिलासा दिलाय. IT ऍक्ट अंतर्गत निशांत अग्रवालला निर्दोष करण्यात आले. मात्र ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट अंतर्गत न्यायालयाने त्याला ठरविले दोषी आहे. निशांत प्रदीपकुमार अग्रवाल पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता.

भारताच्या सर्वात शक्तीशाली ब्राह्मोस या क्षेपणास्त्राची माहिती त्याने पाकिस्तानला पाठवली होती. २०१८ मध्ये घडलेल्या या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली होती. कारण हा ब्रह्मोस एरोस्पेसशी संबंधित पहिला हेरगिरीचा खटला होता. नागपूरच्या जिल्हा न्यायालयाने हेरगिरी प्रकरणी निशांत अग्रवालला दोषी ठरवत जन्मठेप आणि १४ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात निशांत अग्रवाल उच्च न्यायालयात गेला होता.

BrahMos Engineer Pakistan Spying:
छुप्या मार्गे गाईंची तस्करी; आरोपीला विवस्त्र करून पोलीस स्टेशनपर्यंत नेलं, नागपूर हादरलं

आज त्याला न्यायालयातून शिक्षा कमी केल्यानं दिलासा मिळालाय. नागपूर खंडपीठामध्ये जन्मठेप शिक्षेच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने त्याची शिक्षा कमी केली आहे. न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. नागपूर खंडपीठात न्यायमूर्ती द्वय अनिल किलोर आणि प्रवीण पाटील यांचे न्यायपीठात सुनावणी पार पडली. यात तीन वर्षांचा सश्रम करावासाची शिक्षा सुनावली आहे.

निशांत अग्रवाल हा नेहरूनगर, रुडकी, जि. हरिद्वार (उत्तराखंड) येथील मूळ रहिवासी आहे. तो भारत आणि रशियाचा संयुक्त उपक्रम असलेल्या ब्रह्मोस एअरोस्पेस कंपनीच्या नागपुरातील प्रकल्पामध्ये सिस्टम इंजिनिअर पदावर कार्यरत होता. निशांत अग्रवालला २०१८ साली हेरगिरीच्या आरोपातून लखनौ एटीएसने अटक केली होती.

BrahMos Engineer Pakistan Spying:
Delhi Red Fort Blast Case: एनआयएची काश्मीरमध्ये 8 ठिकाणी छापे, तीन जणांना अटक

२०१८ मध्ये या प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली होती. कारण ब्रह्मोस एरोस्पेसशी संबंधित हा पहिला हेरगिरीचा खटला होता. निशांत अग्रवाल नेहा शर्मा आणि पूजा रंजन या दोन फेसबुक अकाउंटद्वारे संशयित पाकिस्तानी गुप्तचर एजंट्सच्या संपर्कात होता. इस्लामाबादमधून चालवले जाणारे हे अकाउंट पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांकडून चालवले जात असल्याचे मानले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com