Sangli Boys Stunt Video : पुलावरून उड्या मारण्याची स्टंटबाजी नडली; पुराच्या पाण्यात तरुण गेले वाहून

Sangli News : आता बातमी स्टंटबाज सांगलीकरांची...आयुर्विन पुलावरु कृष्णेत उड्या घेणं हे पावसाळ्यातलं नेहमीचं दृष्य मात्र, हीच स्टंटबाजी दोन तरुणांच्या अंगलट आलीये. त्यानंतर काय घडलं तुम्हीच पाहा...
पुलावरून उड्या मारण्याची स्टंटबाजी नडली; पुराच्या पाण्यात तरुण गेले वाहून
Sangli Boys Stunt VideoSaam tv
Published On

सांगली : कृष्णा नदीच्या पुरात स्टंटबाजी करणं तरुणांच्या अंगलट आलंय. आयुर्विन पुलावरून तरुणांनी पोहोण्यासाठी उडी मारली होती. पाण्याचा प्रवाह मोठा असल्यानं हे तरुण वाहून चालले होते. एका विद्युत खांबाचा आधार घेत तरुणांनी स्वत: सावरलं आणि आरडाओरड केली. त्यानंतर स्थानिकांनी नदीत झेप घेऊन या बुडणाऱ्या तरुणांना वाचवलंय.

सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात जोरदार पाऊस झाल्यानंतर कोयना धरणातून पाण्याचा कृष्णा नदीत विसर्ग केला जातो. यामुळं दरवर्षी सांगलीला पुराचा फटका बसतो. मात्र याच पूरस्थितीतून नागरिकांना वाचवण्यासाठी जीवघेणी आणि थरारक परंपरा इथले तरुण अजूनही जपत असल्याचं दिसतं. त्यानुसार, कृष्णा नदीला पूर आल्यानंतर ऐतिहासिक आयर्विन पुलावरुन नदी काठी राहणारे तरुण पाण्यात उड्या घेतात. मात्र अशीच स्टंटबाजी करणं एका तरुणाच्या चांगलच अंगलट आलं. त्याला एनडीआरएफच्या टीमनं वाचवलं. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

पुलावरून उड्या मारण्याची स्टंटबाजी नडली; पुराच्या पाण्यात तरुण गेले वाहून
Sangli Earthquake News: भूकंपाने हादरलं सांगली; चांदोली धरण परिसरात भूकंप!

दोन तरुणांनी सांगलीच्या आयर्विन पुलावरुन कृष्णेच्या पात्रात उडी घेतली. त्यानंतर पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळं ते वाहून जात होते. मात्र नदीतील एका खांबाचा त्यांनी आधार घेतला. त्यानंतर नदीकाठच्या नागरिकांनी नदीच्या पाण्यात उडी घेत त्यांचा जीव वाचवला. उडी मारलेल्या तरुणाला पोहताना बराच दम लागल्यानं त्याची अक्षरशः दमछाक झाली..

पुलावरून उड्या मारण्याची स्टंटबाजी नडली; पुराच्या पाण्यात तरुण गेले वाहून
Krishna River News: कृष्णा नदीची पाणीपातळी वाढली, पुराचा धोका; सांगली महापालिका अलर्ट मोडवर

दरवर्षी कृष्णा नदीला पूर आल्यानंतर आयुर्विन पुलावरुन स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांचे व्हिडीओ समोर येतात. दरवर्षी हेच चित्र पाहायला मिळतं...ना प्रशासन या कडे लक्ष देतं ना ग्रामस्थ तरुणांना स्टंटबाजी करण्यापासून थांबवतात. त्यामुळे नको त्या परंपरा जपणारे सांगलीकर तरुणांचा जीव गेल्यावरच सुधारणार का? असा सवाल उपस्थित होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com